...मग मी मंत्रालयात कसं येणार?; ड्रेसकोडवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा चिमटा

By प्रविण मरगळे | Published: December 14, 2020 02:31 PM2020-12-14T14:31:13+5:302020-12-14T14:32:51+5:30

रंगबेरंगी नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? अशी मश्किल टीप्पणी आठवलेंनी केली आहे.

then how do I get into the ministry ?; Union Minister Ramdas Athavale react on Mantralay dress code | ...मग मी मंत्रालयात कसं येणार?; ड्रेसकोडवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा चिमटा

...मग मी मंत्रालयात कसं येणार?; ड्रेसकोडवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा चिमटा

Next
ठळक मुद्देशासकीय कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येतेअधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेतजीन्स, टीशर्टसह गडद रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे घालता येणार नाहीत

मुंबई – सरकारी कर्मचाऱ्यांना मंत्रालयात येण्यासाठी नवीन ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मंत्रालयात येताना कोणते कपडे घालावे याबाबत सरकारने निर्देश जारी केले आहेत. मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्देशात सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही, तसेच स्लीपर्सही न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, मात्र या ड्रेसकोडवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सरकारला चिमटा काढला आहे.

याबाबत रामदास आठवलेंनी ट्विट करून म्हटलंय की, राज्य सरकारने  मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? अशी मश्किल टीप्पणी आठवलेंनी केली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. या परिस्थितीत जर अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावर देखील होतो. या सर्व गोष्टींचा विचार करता मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

चित्रविचित्र नक्षीकामाचे कपडे नको

ड्रेसकोडच्या मार्गदर्शक तत्वानुसार सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जीन्स, टीशर्टसह गडद रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे घालता येणार नाहीत, कर्मचाऱ्यांना सरकारी कार्यालयात स्लीपर्स घालता येणार नाहीत. महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार, चुडीदार कुर्ता आणि आवश्यकता असल्यास दुपट्टा वापरावा असं नमूद करण्यात आलं आहे.

काय आहेत ड्रेसकोडचे नवे नियम

परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.

पुरूष कर्मचाऱ्यांनी  शर्ट आणि पॅंट घालावी.

जिन्स आणि टी शर्ट घालू नये.

महिला कर्मचाऱ्यांनी साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालावे.

कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा.

गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत.

खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.

कार्यालयामध्ये स्लिपरचा वापर करू नये.

Web Title: then how do I get into the ministry ?; Union Minister Ramdas Athavale react on Mantralay dress code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.