शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत तणाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 08:23 IST

नवा अध्यक्ष कोण? काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटाेलेंची वर्णी लागण्याची शक्यता

शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लावायची यावरून महाविकास आघाडीत अजून एकमत झालेले नाही.  पटाेले यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बाेलले जात आहे, तर दुसरीकडे शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून महाआघाडीमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटाेले यांच्या नावावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  विधानसभा ध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी नाना पटाेले यांनी बुधवारी राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांच्यासाेबत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर पटाेले यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेराम यांच्याकडे मंत्रीपदाची दुहेरी जबाबदारी देण्यात आली हाेती. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. संभाव्य प्रदेशाध्यक्षपदाच्या यादीत नाना पटाेले यांचे नाव आघाडीवर हाेते, तसेच पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगाेपाल यांनीही पटाेले यांच्या नावाला पसंती दिली हाेती. 

विधानसभा अध्यक्ष काेण?पटाेले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद काेणाला मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.  हे पद काँग्रेसकडे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर दावा करण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर हा गुंता वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेस मात्र सरकार स्थापनेसाठी सर्वानुमते सहमती मिळालेल्या फाॅर्म्युल्यावर ठाम आहे. 

'या' शक्यतांचीही सुरू आहे चर्चा नाना पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणारआदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना विधानसभेचे अध्यक्षपद वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार  काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार व ते पद बाळासाहेब थोरात यांना देणार अशीही चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीही दावा करणार

मुख्यमंत्री नाराज?नाना पटाेले यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बाेलले जात आहे. अहमद पटेल हयात असताना पूर्वचर्चेविना असा निर्णय कधीही घेण्यात आला नसल्याचे बाेलून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुूत्रांनी दिली. पटाेले यांचा राजीनामा देण्यापूर्वी बाळासाहेब थाेरात, अशाेक चव्हाण आणि सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी हा घटनाक्रम घडला. उद्धव ठाकरे यांनी के.सी. वेणुगाेपाल यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीवरून मुख्यमंत्र्यांनी शंका उपस्थित केली.

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस