शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Uddhav Thackeray: “पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 15:16 IST

तौक्ते वादळाने नुकसान झालेल्यांना लवकरच मदत जाहीर करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत असले तरी अद्याप ठोस मदत झालेली नाही. याच मुद्द्यावरून माजी खासदार आणि भाजपा सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देअनेक गावात अजूनही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत भाजपा नेते निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे

मुंबई – राज्यात आलेल्या तौक्त वादळाच्या नुकसान भरपाईवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात सर्वाधिक कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या घराचे पत्रे उडाले. घरातील नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाकडून या सर्व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यासह अधिकारी दाखल झाले होते.(BJP Nilesh Rane Target CM Uddhav Thackeray over Tauktae Cyclone relief issue)

तौक्ते वादळाने नुकसान झालेल्यांना लवकरच मदत जाहीर करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत असले तरी अद्याप ठोस मदत झालेली नाही. याच मुद्द्यावरून माजी खासदार आणि भाजपा सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, अजून एक पोकळ आश्वासन...पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले एक कवडी दिली नाही, अनेक गावात अजूनही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत असा घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या निकषांच्या बाहेर जाऊन निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्यात आली होती. तोच निकष या ठिकाणीही असेल. मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळातं झालं प्रचंड नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यात ६९५ गावांना फटका बसला. २,५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २६,३५८ नागरिकांना फटका बसला. १२६ शाळा, महाविद्यालये, शासकीय इमारतींचे नुकसान झाले. ७९० झाडे पडली. १६२६ वीजखांब पडले. ४,३५९ घरांचे अंशत: तर ११ घरांचे पूर्णत: नुकसान झाले. दोघांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात १८२० गावांमध्ये फटका बसला. १५५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २७,७९८ नागरिकांना फटका बसला. ११,३९१ घरांचे नुकसान झाले. शासकीय इमारती, शाळा महाविद्यालयांच्या १३५३ इमारतींचे अंशत: नुकसान झाले. विजेचे १०३२ खांब पडले. चार जणांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६४० गावांना फटका बसला. ६,६५२ घरांचे अंशत: तर २३ घरांचे पूर्णत: नुकसान झाले. ३,३७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसानझाले. १५,६४४ नागरिकांना फटका बसला. २२५ शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालयांचे नुकसान झाले. २१ हजार ८९० झाडे पडली. १२८१ वीजखांब पडले. तिघांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ