शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

Basavaraj Bommai: टाटांचा माजी कर्मचारी बनला कर्नाटकचा कारभारी, कोण आहेत बसवराज बोम्मई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 21:39 IST

Karnatak CM Basavaraj Bommai started his career in TaTa Group; know his profile येडीयुराप्पा जेव्हा दिल्लीला गेलेले तेव्हाच बसवराज बोम्मई यांचे नाव त्यांनी दिल्लीश्वरांना सुचविले होते. येडीयुराप्पांच्या मंत्रीमंडळात देखील बोम्मईंना दुसऱे स्थान होते. 2008 मध्ये भाजपात आलेल्या बोम्मईंनी 13 वर्षांत मोठी प्रगती करत मुख्यमंत्री पद गाठले आहे.

Who is Basavaraj S Bommai: कर्नाटकमध्येमुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना आज फुलस्टॉप लागला आहे. बीएस येडीयुराप्पांनी राजीनामा दिल्याने नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चाही आता संपली आहे. बसवराज बोम्मई (Basavaraj S Bommai) कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. कोण आहेत हे बसवराज बोम्मई, लिंगायत समाजावर त्यांचा कितपत प्रभाव आहे, चला जाणून घेऊया. (Karnataka CM Basavaraj S Bommai started his career in TaTa Group as a mechanical engineer.) 

Karnataka CM: कर्नाटकात गृहमंत्र्यांना मिळाली बढती; बसवराज बोम्मई नवे मुख्यमंत्री

येडीयुराप्पा जेव्हा दिल्लीला गेलेले तेव्हाच बसवराज बोम्मई यांचे नाव त्यांनी दिल्लीश्वरांना सुचविले होते. येडीयुराप्पांच्या मंत्रीमंडळात देखील बोम्मईंना दुसऱे स्थान होते. 2008 मध्ये भाजपात आलेल्या बोम्मईंनी 13 वर्षांत मोठी प्रगती करत मुख्यमंत्री पद गाठले आहे. बोम्मई यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. 

बसवराज बोम्मई (Basavaraj S Bommai) यांचा जन्म 28 जानेवारी 1960 मध्ये झाला. बोम्मई हे भाजपाचे नाहीत तर जनता दलाचे. त्यांचे वडील एसआर बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. जनता दलातून बसवराज यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. बोम्मई हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. ते काही काळातच येडीयुराप्पांचे खास बनले. बसवराज बोम्मई यांनी 2008 मध्ये भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून त्याना मागे वळून पहावे लागले नाही. येडीयुराप्पांच्या काळात ते मंत्री होते. (Basavaraj S Bommai political career)

बोम्मई हे मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात टाटा समुहातून (Tata Group) केली होती. दोन वेळा विधान परिषदेवर आणि तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून गेले आहेत. भाजपात जाण्याआधी त्यांनी एचडी देवेगौडा आणि रामकृष्ण हेगडेंसोबत काम केले आहे. 1998 आणि 2004 मध्ये ते धारवाडमधून विधानपरिषदेचे आमदार होते. जनता दल युनायटेड सोडल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. 

टॅग्स :TataटाटाKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणChief Ministerमुख्यमंत्री