शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह प्रकरण कोर्टानं सीबीआयकडे सोपवलं; नितेश राणेंनी 'त्या' नेत्याला पुन्हा डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 12:31 IST

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. यासोबतच न्यायालयानं मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस तपासासाठी सक्षम असून सीबीआय तपासाची आवश्यकता नसल्याची भूमिका वारंवार गृहमंत्री अनिल देशमुख आणि सरकारकडून मांडली जात होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राज्य सरकारसाठी धक्का मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी निकाल दिल्यानंतर भाजपा नेते नितेश राणेंनी ट्विट करून निशाणा साधला आहे. 'अब बेबी पेंग्विन तो गयो!!! इट्स शो टाईम!' असं नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. सत्यमेव जयते, असं ट्विट पार्थ यांनी केलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशा मागणीचं पत्र पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं. देशमुख राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यामुळे पार्थ यांना आपल्याच मंत्र्यांवर विश्वास नाही का, असा प्रश्न निर्माण झाला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांऐवजी मुंबई पोलिसांकडून करण्यात यावा, अशी याचिका सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केली होती. त्यावर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल न्यायालयानं आज सुनावला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा आणि मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं, असं न्यायालयानं निकालात म्हटलं. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र सरकारनं सहकार्य करावं. भविष्यात सर्वोच्च न्यायालयानं सुशांतशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास आपल्या हाती घ्यावा, अशी सूचना न्यायालयानं केली. 'सीबीआय केवळ पाटण्यातील एफआयआरचा तपास करण्यासच सक्षम नाही, तर या प्रकरणाशी संबंधित आणखी गुन्हे दाखल झाल्यास त्यांचा तपासदेखील सीबीआय करेल,' असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतNitesh Raneनीतेश राणे Supreme Courtसर्वोच्च न्यायालय