शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

राजकीय पोळी भाजण्यासाठी सुशांत प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी; गृहमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Updated: September 29, 2020 19:51 IST

मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं षडयंत्र आखल्याचा देशमुखांचा आरोप

मुंबई: बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव आखला गेल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबई पोलिसांना, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा देशमुख यांनी केला. त्यांचा थेट रोख भाजपवर होता. सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं विष आढळून आलं नसल्याचं एम्सच्या अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू होता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र तरीही मुंबई पोलिसांना नाहक बदनाम करण्यात आलं. बिहारमधील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एका राष्ट्रीय पक्षानं महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देशमुख यांनी केला. भाजपचं नाव न घेता त्यांनी हा आरोप केला.बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंह राजपूत प्रकरण पुढे नेण्यात आलं. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा डाव आखण्यात आला. अनेकांवर आरोप करण्यात आले. मुंबई पोलीस काही जणांना वाचवत असल्याचे आरोप केले गेले. बिहारचे डीआयजी गुप्तेश्वर पांडे यांचाही यामध्ये उपयोग करून घेण्यात आला. आता पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे, असं देशमुख म्हणाले.शरद पवारांची सीबीआयच्या तपासावर टीकासर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती तपास देऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीबीआयवर सडकून टीका केली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्याचं काम सीबीआयला दिलं गेलं. त्यांनी काय दिले, कुठे उजेड पाडला. तो त्याचा प्रकाश मला अजून तरी दिसलेला नाही, अशा शब्दांत पवार यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतBJPभाजपाAnil Deshmukhअनिल देशमुख