- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शहा व चित्रपट अभिनेते सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे सनी-भाजप संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यांना पंजाबमधून भाजपतर्फे लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल यांची राष्ट्रवादी व देशभक्ताची प्रतिमा पाहून भाजप त्यांना पंजाबमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतो. तथापि, त्यांच्याकडून निवडणूक लढवण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवलेली नाही; परंतु भाजप अध्यक्ष अमित शहा व सनी यांची नव्याने झालेली भेट पाहता या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही, असे दिसते.
सनी देओल पंजाबमधून भाजपाच्या तिकीटावर लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 06:49 IST