शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

सुधीर मुनगंटीवार अडचणीत; ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 12:48 PM

33 crore plantation: आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून चार महिन्यांत या समितीने अहवाल द्यायचा आहे.

तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आज सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असणार आहेत. (16-member committee to look into the allegations into 33-crore tree plantation drive under Fadnavis govt. The committee includes Nana Patole, Ashish Shelar, & Nitesh Rane.)

आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून चार महिन्यांत या समितीने अहवाल द्यायचा आहे. या समितीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, निलेश राणे आदींचा समावेश आहे. 

राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत केली होती. शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.  राज्यात ३३  कोटी वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम राबविण्याकरिता २०१६ ते २०२० या काळात वनविभागाला २ हजार ४२९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, तो पूर्णपणे वापरण्यात आला आहे. वनविभागाकडून २८.२७ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२० अखेर त्यातील ७५.६३ टक्के झाडे जिवंत आहेत, असे वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले. 

जवळपास २५ टक्के झाडे जगलेली नाहीत; नाना पटोले यांचा हल्लाबोलकाँग्रेसचे वरिष्ठ सदस्य नाना पटोले यांनी, जवळपास २५ टक्के झाडे जगलेली नाहीत. अनेक ठिकाणी फक्त खड्डे खणले; पण लागवडच झाली नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. याकडे लक्ष वेधत विधिमंडळाच्या संयुक्ती समितीमार्फत या लागवडीची चौकशी करण्याची मागणी केली होती. ही वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे, ही वृक्षलागवड एक जनचळवळ बनली, असे सांगत तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोहिमेचे यश अधोरेखित केले होते. चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे, प्रकाश साळुंके, धर्मरावबाबा आत्राम यांनी भाग घेतला होता. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा