शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

आसाम गण परिषदेचा अस्तित्वाचा संघर्ष; काँग्रेस आघाडीचे आव्हान, भाजपचा सहकारी झाला दुबळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 04:51 IST

गुवाहाटी : आसाममध्ये १९८५ मध्ये आंदोलनाच्या परिणामस्वरूप एक पक्ष उदयाला आला. आसाम गण परिषद (एजीपी) त्याचे नाव. आसामी लोकांचा ...

गुवाहाटी : आसाममध्ये १९८५ मध्ये आंदोलनाच्या परिणामस्वरूप एक पक्ष उदयाला आला. आसाम गण परिषद (एजीपी) त्याचे नाव. आसामी लोकांचा अभिमान म्हणून या पक्षाकडे बघितले जात होते. आज रालोआचा दुबळा घटक पक्ष म्हणून आसाम गण परिषदेकडे पाहिले जात आहे. एक काळ असा होता की, भाजपने आसाम गण परिषदेचा ज्युनिअर सहकारी म्हणून राज्यात पाय रोवले होते. मात्र, आज मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वात भाजपचा विस्तार झाला आहे. हेच सोनोवाल कधी काळी एजीपीमध्ये होते. तेच आज भाजपचे राज्यात नेतृत्व करत आहेत. रालोआ जिंकणार की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दहा पक्षांची महाआघाडी हा प्रश्न अनुत्तरित असला तरी एजीपी पूर्वीपेक्षा अधिक कमजोर होऊ शकतो. भाजपकडून २६ जागा मिळविण्यात हा पक्ष यशस्वी ठरला असला तरी यातील बहुतांश जागा जिंकणे अवघड आहे. (The struggle for the existence of the Assam Gana Parishad; The challenge of the Congress front, the BJP's ally became weak) 

एजीपीसाठी का आहे जागा जिंकणे अवघड ? एजीपी आमदारांच्या जागा भाजपने त्यांच्याकडून काढून घेतल्या आहेत. यात माजी मुख्यमंत्री आणि एजीपीचे संस्थापक प्रफुल्ल महंत यांच्या जागेचाही समावेश आहे. महंत यांची प्रकृती सध्या बरी नाही. तथापि, पक्षाचे अध्यक्ष अतुल बोरा यांनी महंत यांची जागा भाजपला देण्यास सहमती दर्शविल्याने महंत यांचे समर्थक नाराज आहेत. 

कारण, काँग्रेसकडून सुरेश बोरा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. ते २०१६ मध्ये महंत यांच्याकडून पराभूत झाले होते. महंत यांचे समर्थक मतदार रालोआच्या विरोधात मतदान करतील तर सत्ताधारी आघाडीसाठी तो धक्का ठरू शकतो. 

- एजीपीने मागील वेळी ज्या जागा जिंकल्या होत्या त्यात कमलपूर, लखीमपूर, नाहरकटिया आणि पटाचारकुची यांचा समावेश आहे. या जागा आता भाजपने आपल्याकडे घेतल्या आहेत. - पटाचारकुची हा मतदारसंघ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रणजीत दास यांनी एजीपीकडून घेतला आहे. - भाजपने गतवेळच्या आपल्या ८ जागा एजीपीला दिल्या आहेत. मात्र, काँग्रेस - एआययूडीएफ आघाडीमुळे या जागा जिंकणे अवघड झाले आहे. कारण, हे मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत. 

- २०१६ च्या आकड्यांचा आधार घेतला तर काँग्रेस- एआययूडीएफचे मते संयुक्तपणे ५४ टक्क्यांवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेस आणि एआययूडीएफ यांच्यात मतांची विभागणी झाली होती. काँग्रेसने ३१ टक्के, तर एआययूडीएफने २३ टक्के मते घेतली होती, तर भाजप-एजीपीला ४१.९ टक्के मते मिळाली होती. 

- राहा, बभनीपूर, नोबोइचा या मतदारसंघात एजीपी काट्याची लढत देऊ शकते.  

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेस