सृष्टी गोस्वामी बनणार उत्तराखंडची ‘एका दिवसासाठी मुख्यमंत्री’; त्रिवेंद्र सिंह रावतांचे अधिकाऱ्यांना आदेश

By प्रविण मरगळे | Published: January 22, 2021 04:26 PM2021-01-22T16:26:59+5:302021-01-22T16:30:02+5:30

हरिद्वारच्या दौलतपूर गावातील सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री बनणार आहे.

Srishti Goswami Of Haridwar Will Become The Chief Minister Of Uttarakhand on 24th January | सृष्टी गोस्वामी बनणार उत्तराखंडची ‘एका दिवसासाठी मुख्यमंत्री’; त्रिवेंद्र सिंह रावतांचे अधिकाऱ्यांना आदेश

सृष्टी गोस्वामी बनणार उत्तराखंडची ‘एका दिवसासाठी मुख्यमंत्री’; त्रिवेंद्र सिंह रावतांचे अधिकाऱ्यांना आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देसृष्टी गोस्वामीसमोर सर्व विभागीय अधिकारी त्यांच्या विभागाचा कार्य अहवाल सादर करतीलउत्तराखंडच्या बालहक्क संरक्षण आयोगानं लिहिलं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत बाल विधानसभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

हरिद्वार – बॉलिवूडमध्ये सिनेमा ‘नायक’मध्ये अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री होतो, त्यानंतर त्या दिवसभरात तो अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना काढून टाकतो, अनेक गरिबांची कामं करतो..एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याचा कारभार हाकण्याचं चॅलेंज तो स्वीकारतो, हे सगळं सिनेमात पाहायला मिळालं असेल पण खऱ्या आयुष्यात १ दिवसासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला तर...उत्तराखंडमध्ये एका मुलीला ही संधी २४ जानेवारी रोजी मिळणार आहे.

हरिद्वारच्या दौलतपूर गावातील सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री बनणार आहे. २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय कन्या दिन असल्यानं त्यादिवशी एक दिवसासाठी बाल मुख्यमंत्री म्हणून ती पदभार ग्रहण करणार आहे. त्यानंतर सृष्टी गोस्वामीसमोर सर्व विभागीय अधिकारी त्यांच्या विभागाचा कार्य अहवाल सादर करतील. उत्तराखंडच्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा उषा नेगी यांनी याबाबत मुख्य सचिव ओमप्रकाश यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात लिहिलं आहे की, २४ जानेवारी रोजी युवतींच्या सशक्तीकरणासाठी आयोगाने एका हुशार मुलीला एका दिवसासाठी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री सृष्टी गोस्वामी उत्तराखंडच्या विभागीय कार्यालयाच्या कामाचा आढावा घेणार आहे. त्यासाठी विभागाचे अधिकारी आपल्या कार्याचा अहवाल ५ मिनिटं बाल विधानसभेत देतील. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत बाल विधानसभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

सृष्टी गोस्वामी दौलतपूरची रहिवासी आहे. रुडकीच्या बीएमएम पीजी कॉलेजमधून तिने बीएससी एग्रीकल्चरची विद्यार्थी आहे. बाल विधानसभेत दर ३ वर्षाने बाल मुख्यमंत्र्याची निवड केली जाते, सृष्टी गोस्वामीने यासाठी तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तिने या पदासाठी माझी निवड केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले आहेत. या निवडीबद्दल सृष्टीच्या आई-वडिलांनी सांगितले की, आम्हाला अभिमान वाटतो, मुलीला साथ दिली तर ती यशाचं शिखर नक्की जिंकते, आम्ही उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो असं त्यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे २४ जानेवारी रोजी सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी मुख्यमंत्री होणार आहे, उत्तराखंड विधानसभेत १२० नंबरच्या खोलीत बाल विधानसभेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासाठी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मान्यता आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत  

Web Title: Srishti Goswami Of Haridwar Will Become The Chief Minister Of Uttarakhand on 24th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.