महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी, मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी, आता हे ठरले वादाचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 09:08 PM2021-05-13T21:08:17+5:302021-05-13T21:10:42+5:30

Maharashtra Politics : काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा सुरू आहे..

The spark in the Mahavikas Aghadi again, the Chief Minister's displeasure with Pawar, now this has become the cause of controversy | महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी, मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी, आता हे ठरले वादाचे कारण

महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी, मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी, आता हे ठरले वादाचे कारण

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीतून राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी होऊन महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले होते. तीन पक्ष एकत्र आल्याने या सरकारमध्ये सुरुवातीपासूनच कमीअधिक प्रमाणात मतभेद निर्माण होत होते. मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा सुरू आहे.. जलसंपदा विभागातील सचिवांच्या निवडीवरून मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये मतभेद झाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. 

या संदर्भातील वृत्त टीव्ही नाईनने दिले आहे.  या खडाजंगीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याप्रमाणे प्रशासनाला हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यातच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना हटवून त्यांच्याऐवजी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकारांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज आहेत. त्यातूनच मुख्यमंत्र्यांनी ही बाबत शरद पवार यांच्या कानावर घातली आहे. 
 
दरम्यान, याबाबत आज जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चा बाहेर न सांगण्याची परंपरा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात चर्चिले गेलेले विषय बाहेर सांगू नयेत, असे मला वाटले. बाकी मला जे काही बोलायचे आहे ते मी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असे पाटील यांनी सांगितले. 
 

Web Title: The spark in the Mahavikas Aghadi again, the Chief Minister's displeasure with Pawar, now this has become the cause of controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app