शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'बाळासाहेब ठाकरे दर्शन घेण्याएवढे थोर आहेत, तर त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी का केली ?'-दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 14:22 IST

Deepak Kesarkar on Narayan Rane: 'बाळासाहेब जिवंत असताना त्रास द्यायचा आणि ते गेल्यावर नाटकं करायची.'

सिंधुदुर्ग: 'बाळासाहेब ठाकरेंचं दर्शन घेण्याएवढे ते थोर आहेत, तर मग त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी का केली होती ?' असा सवाल शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना केला आहे. तसेच, 'बाळासाहेब जिवंत असताना त्रास द्यायचा आणि ते गेल्यावर नाटकं करायची,' अशी टीकाही केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

यावेळी केसरकर म्हणाले की, 'बाळासाहेब जिवंत असताना त्यांना त्रास दिला आणि ते गेल्यावर नाटकं करायची, हे मला अजिबात आवडलं नाही. जर बाळासाहेब ठाकरेंचं दर्शन घेण्याएवढे बाळासाहेब थोर आहेत, तर मग त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यांनी का केली होती ? त्यामुळे राणेंनी नितीमत्तेच्या गोष्टीच करू नयेत,' असा टोला केसरकर यांनी लगावला.

केसरकर पुढे म्हणाले की, 'राजकारणासाठी मी माझ्या प्रॉपर्टी विकतो, कर्ज घेतो, ते कर्ज फेडतो, पण माझी नैतिकता कधी ढासळली नाही. ही नैतिकता असल्यानंच मी लढे देऊ शकतो. माझा लढा कोकणाचा विकासासाठी आहे. राणेंच्या मुलानं मला धमक्या दिल्या, पण या धमक्यांना मी अजिबात भीक घालत नाही,' असंही केसरकर म्हणाले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे