शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

'उद्धव ठाकरे आपडा'नंतर 'रासगरबा'; मुंबईत शिवसेना भाजपला देणार धक्का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 12:54 PM

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर कसली; भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी रणनीती

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या मतपेढीला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेनं जोरदार तयारी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं गुजराती, मारवाडी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या ७ फेब्रुवारीला शिवसेनेनं मालाडमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यावेळी २१ गुजराती उद्योजक, व्यापारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.गुजराती माणसाने उद्धव ठाकरे यांना आपडा म्हटले तर तुमचा तीळ पापडा का झाला?मुंबई उपनगरात काही भागांत गुजराती, मारवाडी समाजाचं प्राबल्य आहे. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये ही मतं निर्णायक ठरू शकतात. या एकगठ्ठा मतांमुळेच मालाड, कांदिवली, बोरिवली भागांत भाजपचं वर्चस्व आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हे दिसून आलं आहे. त्यामुळे आता या मतपेढीला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न शिवसेनेनं सुरू केले आहेत. त्यासाठी मालाडमध्ये ७ फेब्रुवारीला एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात गुजराती उद्योजक, व्यापारी हाती शिवबंधन बांधतील. याशिवाय गुजरातीबहुल भागांमध्ये शिवसेना रासगरबादेखील आयोजित करणार आहे.मुंबई मा जलेबी ने फाफड़ा, उद्धव ठाकरे आपडा; शिवसेनेची गुजराती बांधवांना घातली साद गेल्या महिन्यात शिवसेनेनं गुजराती मेळाव्याचं आयोजन केलं होतं. गुजराती समाजाला आकर्षित करण्यासाठी 'मुंबई मा जलेबी ने फाफडा; उद्धव ठाकरे आपडा' अशी टॅगलाइनदेखील तयार करण्यात आली. अंधेरी-ओशिवरामधील गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये शिवसेनेनं मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला १०० गुजराती व्यापारी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनं गुजराती समाजाला आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे