'उद्धव ठाकरे आपडा'नंतर 'रासगरबा'; मुंबईत शिवसेना भाजपला देणार धक्का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 12:54 PM2021-02-03T12:54:40+5:302021-02-03T13:00:32+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर कसली; भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी रणनीती

shiv sena organised raas garba for gujarati community to tackle bjp in bmc election | 'उद्धव ठाकरे आपडा'नंतर 'रासगरबा'; मुंबईत शिवसेना भाजपला देणार धक्का? 

'उद्धव ठाकरे आपडा'नंतर 'रासगरबा'; मुंबईत शिवसेना भाजपला देणार धक्का? 

Next

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या मतपेढीला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेनं जोरदार तयारी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं गुजराती, मारवाडी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या ७ फेब्रुवारीला शिवसेनेनं मालाडमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यावेळी २१ गुजराती उद्योजक, व्यापारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

गुजराती माणसाने उद्धव ठाकरे यांना आपडा म्हटले तर तुमचा तीळ पापडा का झाला?

मुंबई उपनगरात काही भागांत गुजराती, मारवाडी समाजाचं प्राबल्य आहे. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये ही मतं निर्णायक ठरू शकतात. या एकगठ्ठा मतांमुळेच मालाड, कांदिवली, बोरिवली भागांत भाजपचं वर्चस्व आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हे दिसून आलं आहे. त्यामुळे आता या मतपेढीला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न शिवसेनेनं सुरू केले आहेत. त्यासाठी मालाडमध्ये ७ फेब्रुवारीला एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात गुजराती उद्योजक, व्यापारी हाती शिवबंधन बांधतील. याशिवाय गुजरातीबहुल भागांमध्ये शिवसेना रासगरबादेखील आयोजित करणार आहे.

मुंबई मा जलेबी ने फाफड़ा, उद्धव ठाकरे आपडा; शिवसेनेची गुजराती बांधवांना घातली साद 

गेल्या महिन्यात शिवसेनेनं गुजराती मेळाव्याचं आयोजन केलं होतं. गुजराती समाजाला आकर्षित करण्यासाठी 'मुंबई मा जलेबी ने फाफडा; उद्धव ठाकरे आपडा' अशी टॅगलाइनदेखील तयार करण्यात आली. अंधेरी-ओशिवरामधील गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये शिवसेनेनं मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला १०० गुजराती व्यापारी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनं गुजराती समाजाला आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: shiv sena organised raas garba for gujarati community to tackle bjp in bmc election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.