शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे; 'महाराष्ट्रद्रोहा'वरून फडणवीसांनी सुनावलं
By कुणाल गवाणकर | Updated: November 25, 2020 17:43 IST2020-11-25T17:42:18+5:302020-11-25T17:43:01+5:30
शिवसेनेकडून सातत्यानं होणाऱ्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार

शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे; 'महाराष्ट्रद्रोहा'वरून फडणवीसांनी सुनावलं
पुणे: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) टाकलेल्या छाप्यांमुळे सध्या राज्यातलं राजकारण तापलं आहे. यावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर लक्ष्य केलं आहे. याआधी शिवसेनेनं अर्णब गोस्वामी, सुशांत सिंह राजपूत, कंगना राणौत प्रकरणावरून भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हटलं होतं. हाच धागा पकडत शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे, त्यामुळे शिवसेनेवरील टीका महाराष्ट्रद्रोह नव्हे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार
आम्ही शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजू नये, असा टोला फडणवीस यांनी लगावला. कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. आम्ही पण महाराष्ट्रातीलच नेते आहोत. आम्हालाही राज्याच्या अस्मितेचं भान आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला महाराष्ट्रद्रोही म्हणायचं, अशी शिवसेनेची कार्यपद्धती आहे, असं फडणवीस म्हणाले.
…अन् पहाटेचा शपथविधी पार पडला; अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काय संवाद झाला?
पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाली, असा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचाही समाचार घेतला. जयंत पाटील यांचं हे वक्तव्य म्हणजे त्यांनी आपला पराभव मान्य केल्याचे संकेत आहेत. या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रावर खापर फोडता येणार नाही म्हणून आता जयंत पाटील बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा उकरून काढत आहेत. आपण निवडणुकीत पराभूत होणार, याची जाणीव असल्यानं त्यांनी आतापासूनच अशा प्रकारचे आरोप सुरू केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.
‘तक्रार करण्यापुरताी का होईना, विरोधकांची दखल घेतली याचा आनंद’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यापुरता का होईना, पण भाजपच्या आंदोलनाची दखल घेतली, याचा आनंद असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलं. आजपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रं पाठवली, सल्ले दिले. पण यापैकी एका पत्राचीही उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.