शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना खासदारांत अस्वस्थता, की षडयंत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 06:35 IST

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती करण्यावरून शिवसेनेत खदखद असून ‘युती करा, अन्यथा आम्हाला उमेदवारी नको’, अशी भूमिका काही खासदारांनी घेतली असल्याचे समजते.

मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती करण्यावरून शिवसेनेत खदखद असून ‘युती करा, अन्यथा आम्हाला उमेदवारी नको’, अशी भूमिका काही खासदारांनी घेतली असल्याचे समजते. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी याचाइन्कार केला असून आमच्या विरोधात कोणीतरी षडयंत्र करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.भाजपा-शिवसेना युतीची शक्यता दुरावत चालल्यामुळे दोन्ही पक्षात अस्वस्थता आहे. विशेषत: दोन्ही पक्षाचे विद्यमान खासदार-आमदार युतीसाठी आग्रही आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे १८ तर भाजपाचे २४ खासदार निवडून आले. युती झाली नाही, तर ही संख्या कमी होईल, अशी भीती काही नेते खासगीत व्यक्त करत आहेत.शिवाजीराव आढळराव पाटील (शिरुर), चंद्रकांत खैरे (औरंगाबाद) आणि अमरावतीचे आनंदराव अडसूळ हे तीन सेना खासदार युतीसाठी आग्रही आहेत. ‘मातोश्री’वर जाऊन ते आपली भूमिका मांडणार होते. त्यासाठी ते आणखी काही खासदारांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्याआधीच ‘बातमी’ फुटल्याने प्रयत्न फसला, अशी चर्चा आहे.मात्र स्वत: खैरे आणि पाटील यांनी याचा इन्कार केला आहे. खा.पाटील म्हणाले, शिवसेनेच्या कोणत्याही खासदाराने अशी मागणी केली नाही. युती व्हावी ही आमची इच्छा आहे. युती झाल्यास उत्तमच होईल, धावपळ कमी होईल. परंतु, या बाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घ्यायचा आहे. पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याची कोणाचीही हिंमत नाही. उद्धवजी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे खा. खैरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.>युती व्हावी असे आम्हाला वाटते, पण समजा नाही झाली तरी आम्ही लढू आणि जिंकूदेखील. युतीसाठी आम्ही पक्षनेतृत्वावर कोणताही दबाव वगैरे आणलेला नाही. उद्धवजींवर आम्ही दबाव कसा आणणार? ते आमचे नेते आहेत.- खा. शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव