शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

कंगनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; संजय राऊत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 4:31 PM

कंगना राणौतचा आक्रमक पवित्रा कायम; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष्य

मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. काल मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर तोडक कारवाई केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या कंगनानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दांमध्ये घणाघाती टीका सुरू केली. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.“शिवसेना मंत्र्यांचं मुंबईमधील कार्यालय अनधिकृत; १ वर्षापूर्वी नोटीस बजावूनही कारवाई नाही”कंगनाचं विधान ११ कोटी मराठी जनतेनं ऐकलंय, असं संजय राऊत यांनी म्हटलं. ज्या गोष्टी मला माहीत नाही. त्यावर भाष्य करणार नाही, असं म्हणत राऊत यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. याआधी कंगनाच्या विधानावर राऊत यांनी जोरदार टीका केली होती. कंगनाच्या प्रत्येक विधानाचा समाचार घेणाऱ्या राऊत यांनी आज त्यांचा पवित्रा बदलल्याचं पाहायला मिळालं. कंगना प्रकरणावरून प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना प्रवक्त्यांना मातोश्रीवरून करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आज राऊत यांनी कंगनाच्या टीकेला उत्तर देणं टाळलं.बीएमसी नोटिशीच्या वादात कंगनानं शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाडांनीही दिलं प्रत्युत्तर

कंगनाचे शिवसेनेवरील हल्ले सुरूचकाल मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कंगनानं आज सकाळी ट्विटरच्या माध्यमातून कंगनाला पुन्हा लक्ष्य केलं. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, आज ते सत्तेसाठी ती विचारधारा विकून शिवसेना ते सोनिया सेना बनली आहे, ज्या गुंडांनी माझ्यामागे माझं घर तोडलं त्यांना सिविक बॉडी म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका अशा शब्दात कंगना राणौतनं शिवसेनेवर आरोप केला आहे.

कंगना राणौतनं ट्विट करुन सांगितलं आहे की, तुमच्या वडिलांचं चांगलं कार्य तुम्हाला पैसा देऊ शकतात पण सन्मान स्वत:ला कमवायला लागतो. माझं तोंड बंद कराल पण माझा आवाज लाखो लोकांपर्यंत पोहचेल. किती जणांची तोंडे बंद करणार? किती आवाज दाबणार? कधीपर्यंत सत्यापासून पळत राहणार तुम्ही काहीच नाही फक्त घराणेशाहीचं उदाहरण आहात अशी घणाघाती टीका कंगनानं केली आहे.त्याचसोबत निवडणुकीत हरल्यानंतर निर्लज्जपणे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करत शिवसेनेचं सोनिया सेनेत रुपांतर केले असंही कंगनानं म्हटलं आहे.

कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादात बुधवारी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रात्री कंगनाने ट्वीट करून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. रात्री केलेल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, मी आता आपल्या मुंबईत आहे. आपल्या घरात आहे. माझ्यावर वारसुद्धा करण्यात आला, पण तो मी विमानात असताना मागून करण्यात आला. मला समोरून नोटिस देण्याची किंवा समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही. माझ्या कार्यालयाच्या करण्यात आलेल्या नुकसानामुळे अनेक लोक दु:खी आणि चिंतित आहेत. मी त्यांचे आशीर्वाद आणि प्रेमासाठी ऋणी आहे असं कंगनानं म्हटलं होतं.

माझ्या शत्रूमध्ये समोरून वार करण्याची हिंमत नाही, कंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा वारही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - देवेंद्र फडणवीस

अभिनेत्री कंगना रनौत हिच्या घराचे बांधकाम ज्या पद्धतीने पाडण्यात आले त्यावरून राज्यात सरकार पुरस्कृत दहशत सुरू असल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतके घाबरट आणि लोकशाहीविरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेले नाही. आपल्या विचारांचा विरोध करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार या सर्वांना दाबण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याने मुंबई, महाराष्ट्राचा अवमान होतो त्याचे समर्थन करता येत नाही; पण सरकारच्या अशा दहशतीचेही समर्थन करता येणार नाही. या कृतीमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही

बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांच्यातील थेट संबंधच आजच्या प्रकरणाने उघड झाले आहेत. या कंपूने माझे घर आणि मलाही मारून टाकले, तरी यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. अचानक माझे कार्यालय अनधिकृत बनले, २४ तासांत ते तोडले गेले. आता माझे घर पाडण्याची धमकी दिली जात आहे. बॉलीवूड माफियांचे लाडके असणारे, जगातले भारी मुख्यमंत्री म्हणून मिरविणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे अंदाज यानिमित्ताने खरे ठरले, असे कंगनाने म्हटले आहे.

कार्यालयानंतर कंगनाच्या फ्लॅटवर बीएमसीची नजर

मुंबई महापालिकेने दिवाणी न्यायालयाकडे कंगना रणौतचे खारमधील घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. पालिकेचे म्हणणे आहे की कंगनाच्या फ्लॅटमध्ये आठ ठिकाणी अवैध बांधकाम करण्यात आले आहे. मुंबईतील खार रोड पश्चिम भागात 16 व्या रोडवर डिब्रीझ अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर कंगनाचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने २०१८ मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती. मुंबई महापालिकेच्या एमआरटीपी नोटीस विरोधात तिने दिंडोशी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टाने कंगनाची बाजू ऐकून घेत पुढील कारवाईस स्टे दिला होता, तर पालिकेला यावर सविस्तर बाजू मांडण्यास सांगितले होते.

कंगनाची जीभ घसरली

महापालिकेने केलेल्या पाडकामाच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत, ‘आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल. हा काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो,’ असे म्हणत बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ यानिमित्ताने उघड झाल्याचा आरोपही केला.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना