शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मिटिंगमध्ये शिवसेनेला मानाचं स्थान, संजय राऊतांशी साधला विशेष संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 14:15 IST

Sanjay Raut & Rahul Gandhi News: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे आव्हान मोडीत काढण्यासाठी विरोधकांनी आतापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे आव्हान मोडीत काढण्यासाठी विरोधकांनी आतापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच प्रत्यय सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात येत आहे. या अधिवेशनादरम्यान, पेगासस फोन टॅपिंगसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेचं कामकाज रोखून धरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवर चर्चा कऱण्यासाठी राहुल गांधी यांनी आज विरोधी पक्षांमधील विविध नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देशभरातील विविध विरोधी पक्षातील नेत्यांसोबत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हेसुद्धा उपस्थित होते. (Opposition Party floor leaders from Lok Sabha & Rajya Sabha attend a breakfast meeting called by Congress leader Rahul Gandhi) 

विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीत सहभागी झालेल्या संजय राऊत यांना या बैठकीत पहिल्या पंक्तीत स्थान देण्यात आले होते. तसेच राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात यावेळी काही काळ अनौपचारिक चर्चाही झाली. तसेच या संवादाचा फोटो काँग्रेसकडून सोशल मीडियावर विशेष करून  शेअर करण्यात आल्याने शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री आता अधिक दृढ झाल्याचे संकेत मिळत आहेत. 

दरम्यान,  पेगॅसस फोन टॅपिंगप्रकरणी सविस्तर चर्चेची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यावरुन गेले दोन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज होउ शकले नाही. केंद्र सरकारने विरोधकांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे पुढील रणनिती काय असावी, याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. याशिवाय विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या ठिकाणी संसदेबाहेर समांतर अधिवेशन घेण्याची योजना असल्याचे सुत्रांनी सांगितले. पेगॅसस प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि केंद्र सरकारकडून कोरोना महामारीच्या हताळणीचे मुद्दे समांतर अधिवेशनाद्वारे जनतेसमोर मांडण्याची विरोधकांची योजना आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण