शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

"CM साहेब... विचार बदला, तेव्हाच देश बदलेल"; तीरथ सिंह रावतांच्या फाटलेल्या जीन्स विधानावरून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 11:58 IST

uttarakhand chief minister tirath singh rawat statement ripped jeans : एका कार्यक्रमामध्ये तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले असून यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या विधानावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या  आणि लोकसभेच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आहेत. तीरथ सिंह रावत सध्या आपल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमामध्ये तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले असून यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत," असे विधान तीरथ सिंह रावत यांनी केले आहे. यावरून विरोधी पक्षांनी निशाणा साधत तीरथ सिंह रावत यांनी महिलांची माफी मागावी, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या विधानावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या  आणि लोकसभेच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महुआ मोइत्रा यांनी ट्विटरवरून तीरथ सिंह रावत यांच्यावर हल्लाबोल केला. "उत्तराखंडचे मुख्यमंत्री, एनजीओ चालवतात आणि तुमचे गुडघे फाडलेले दिसतात? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही राज्य चालवता आणि तुमचे मन फाटलेले दिसते?", असे महुआ मोइत्रा यांनी ट्विट केले आहे.

दुसरीकडे, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तीरथ सिंग रावत यांच्या या विधानावर टिप्पणी केली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, "देशातील संस्कृती आणि संस्कारावर त्या पुरुषांना फरक पडतो, जो महिलांना आणि त्यांच्या कपड्यांना जज करतात. विचार बदला मुख्यमंत्री रावतजी, तेव्हाच देश बदलेल."

काय म्हणाले होते मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत?मिळालेल्या माहितीनुसार, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत, असे विधान केले आहे. तसेच, मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असे देखील ते म्हणाले आहेत. तीरथ सिंह रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. "एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला."

("आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे कसले संस्कार आहेत?"; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं विधान)

"महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असे नव्हते" असेही रावत यांनी म्हटले आहे. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चालले आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावे लागेल, असे देखील रावत यांनी म्हटले आहे. काही दिवसांवपूर्वी रावत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ही प्रभू रामासोबत केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणWomenमहिलाIndiaभारतBJPभाजपाtmcठाणे महापालिकाShiv Senaशिवसेना