शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

... जर मी लिहायचं म्हटलं तर खूप स्फोट होतील : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 10:36 IST

Sanjay Raut : "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच राजकारणात आलो," राऊत यांनी उलगडला जीवनप्रवास

ठळक मुद्दे"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच राजकारणात आलो," राऊत यांनी उलगडला जीवनप्रवास

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच काम करायचं आहे हे मनात पक्क होतं, अशी एक आठवण शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपला प्रवास उलगडताना सांगितली. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी "फेस टू फेस" या नव्या कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेतली. राजकीय व्यक्तींची अराजकीय मुलाखत असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या मुलाखतीदरम्यान राऊत यांनी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि महाविकास आघाडीची स्थापना यावरही उत्तर दिलं. 

"राज ठाकरे यांनी शिवसेनेची साथ सोडणं आणि राज्यात महाविकास आघाडीची स्थापना होणं हे महाराष्ट्राच्या तसंच शिवसेनेच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना आहेत. राज ठाकरे जेव्हा पक्ष सोडून गेले तेव्हा जवळच्या घडामोडीतला मी एक साक्षीदार आहे. खुप गोष्टी मी पाहिल्या. त्या दिवशी मी त्यांच्या घरी होती. त्या दिवशी त्यांचे लोक माझी गाडी तोडत होते हेदेखील मी पाहिलं. मनोहर जोशीही निघून गेले. मी जर लिहायला गेलो तर खूप मोठे स्फोट होतील," असं संजय राऊत म्हणाले. 

राजकारणात नसता, तर काय व्हायला आवडलं असतं; संजय राऊत म्हणाले...

"महाविकास आघाडीच्या घटनाक्रमाबद्दल अनेकांनी लिहिलं. पण अनेकांनी लिहिलेल्या घटनाक्रमात काहीच अर्थ नाहीये. अनेकदा लोकं मला राजकारणावर लिहा, सिंहासन २ लिहा असं सांगतात. आपण अनेक गोष्टी पाहिल्यात, आपण का लोकांना अडचणीत आणायचं?," असा सवालही त्यांनी केला. जे तुम्ही वाचता त्यात काही सत्य नाही. पडद्यामागे काही वेगळंच घडलं आहे, आज जे सत्तेत बसलेत त्यांनाही त्या पडद्यामागची पटकथा माहित नसल्याचं राऊत यांनी नमूद केलं.  राजकारणात नसतो तर..."राजकारणात नसतो तर मी पत्रकारचं झालो असतो. पत्रकारीतेलाच मी माझा पेशा म्हणून स्वीकारलं होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ असल्यामुळे राजकारणात आलो. सामना या वृत्तपत्राची दखल ही सर्वत्र घेतली जाते. त्याचा संपादक हा राजकारणीच असतो. संपादकांना एखादी भूमिका असावी, ती नसली तर वृत्तपत्र पुढे नेता येणार नाही. टिळक, आगरकर, अत्रे यांनाही भूमिका होती," असंही राऊत म्हणाले.

"सामना हे माझं खरं घर आहे. माझं अख्ख आयुष्य त्या ठिकाणी काढलं. मी शिवसेना भवनात जातो, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा मी अनेकदा मातोश्रीवर जायचो, देशभरात जातो, अशा अनेक गोष्टी मला आवडतात," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या घरातील एक मजेशीर किस्साही सांगितला. "माझ्या मुलींना वाटतं की मला काही गोष्टींचं ज्ञान नाही. मग त्या मला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. घरी आल्यावर युट्यूब वगैरे अशा काही गोष्टी करतो. त्या मला अनेक गोष्टी या पाहा ते पाहा हे सांगत असतात. सध्याची पीढी ही इतिहासापासून तुटत चाललीये. सध्या जे चाललंय तेच त्यांना इतिहास वाटतो. देश कसा घडला याचा इतिहास त्यांना माहित नाही," असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे