शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा काय विरोध हे माहित नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो; लॉकडाऊनवरून राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 13:22 IST

केंद्रान सर्व राज्यांना मदत करणं आवश्यक. महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल राऊत यांचं वक्तव्य

ठळक मुद्देकेंद्रान सर्व राज्यांना मदत करणं आवश्यक : संजय राऊतमहाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल राऊत यांचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत दिले होते. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्यव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊनला काँग्रेसनं विरोध केला आहे. परंतु यावरून शिवसेनेचे नेते राऊत यांनी आज काँग्रेसला टोला लगावला. काँग्रेसचा काय विरोध आहे हे माहिती नाही. इतर विषयांप्रमाणे हादेखील त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो, असं म्हणत संजय राऊत यांनी लॉकडाऊनवरून काँग्रेसला टोला लगावला."काँग्रेसचा काय विरोध आहे हे माहिती नाही. इतर विषयांप्रमाणे हादेखील त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो. पण लॉकडाऊन व्हावं किंवा नाही हा राष्ट्रीय प्रश्न आहे. याचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात. मुख्यमंत्री फार आनंदानं अशा प्रकारचे निर्णय घेतात असं नाही. काही आपात्कालिन परिस्थितीनुसार असे निर्णय मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना घ्यावे लागतात," असं राऊत यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केलं. केंद्रानं मदत करणं आवश्यककेंद्र सरकारनं सर्व राज्यांना मदत करणं गरजेचं आहे. विशेषत: महाराष्ट्राला मदत करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल. पण फक्त महाराष्ट्रात भाजपचं राज्य नाही म्हणून त्यांची कोंडी करायची हे राष्ट्रीय एकात्मतेला आणि संसदीय लोकशाहीला धरून नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडतायत. त्याचं कारण म्हणजे आपल्याकडे चाचण्या मोठ्या प्रमामात होतायत. इतर राज्यात तसं नाही. महाराष्ट्राचं कौतुक करायला हवं. यातून महाराष्ट्र लवकर बाहेर पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. "प्रत्येकाचं काही वैयक्तिक मत असू शकतं. परंतु एक राज्य आणि एक देश म्हणून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना काही निर्णय घेणं बंधनकारक असतं. ते राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी असतं," असंही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी