शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' बनलीय”; कंगनानं पुन्हा डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 10:27 IST

निवडणुकीत हरल्यानंतर निर्लज्जपणे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करत शिवसेनेचं सोनिया सेनेत रुपांतर केले असंही कंगनानं म्हटलं आहे.

ठळक मुद्देकधीपर्यंत सत्यापासून पळत राहणार तुम्ही काहीच नाही फक्त घराणेशाहीचं उदाहरण आहातमाझं तोंड बंद कराल पण माझा आवाज लाखो लोकांपर्यंत पोहचेल. मला समोरून नोटिस देण्याची किंवा समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, आज ते सत्तेसाठी ती विचारधारा विकून शिवसेना ते सोनिया सेना बनली आहे, ज्या गुंडांनी माझ्यामागे माझं घर तोडलं त्यांना सिविक बॉडी म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका अशा शब्दात कंगना राणौतनं शिवसेनेवर आरोप केला आहे.

कंगना राणौतनं ट्विट करुन सांगितलं आहे की, तुमच्या वडिलांचं चांगलं कार्य तुम्हाला पैसा देऊ शकतात पण सन्मान स्वत:ला कमवायला लागतो. माझं तोंड बंद कराल पण माझा आवाज लाखो लोकांपर्यंत पोहचेल. किती जणांची तोंडे बंद करणार? किती आवाज दाबणार? कधीपर्यंत सत्यापासून पळत राहणार तुम्ही काहीच नाही फक्त घराणेशाहीचं उदाहरण आहात अशी घणाघाती टीका कंगनानं केली आहे.त्याचसोबत निवडणुकीत हरल्यानंतर निर्लज्जपणे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करत शिवसेनेचं सोनिया सेनेत रुपांतर केले असंही कंगनानं म्हटलं आहे.

दरम्यान, कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादात बुधवारी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रात्री कंगनाने ट्वीट करून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. रात्री केलेल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, मी आता आपल्या मुंबईत आहे. आपल्या घरात आहे. माझ्यावर वारसुद्धा करण्यात आला, पण तो मी विमानात असताना मागून करण्यात आला. मला समोरून नोटिस देण्याची किंवा समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही. माझ्या कार्यालयाच्या करण्यात आलेल्या नुकसानामुळे अनेक लोक दु:खी आणि चिंतित आहेत. मी त्यांचे आशीर्वाद आणि प्रेमासाठी ऋणी आहे असं कंगनानं म्हटलं होतं.

ही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - देवेंद्र फडणवीस

अभिनेत्री कंगना रनौत हिच्या घराचे बांधकाम ज्या पद्धतीने पाडण्यात आले त्यावरून राज्यात सरकार पुरस्कृत दहशत सुरू असल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतके घाबरट आणि लोकशाहीविरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेले नाही. आपल्या विचारांचा विरोध करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार या सर्वांना दाबण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याने मुंबई, महाराष्ट्राचा अवमान होतो त्याचे समर्थन करता येत नाही; पण सरकारच्या अशा दहशतीचेही समर्थन करता येणार नाही. या कृतीमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही

बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांच्यातील थेट संबंधच आजच्या प्रकरणाने उघड झाले आहेत. या कंपूने माझे घर आणि मलाही मारून टाकले, तरी यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. अचानक माझे कार्यालय अनधिकृत बनले, २४ तासांत ते तोडले गेले. आता माझे घर पाडण्याची धमकी दिली जात आहे. बॉलीवूड माफियांचे लाडके असणारे, जगातले भारी मुख्यमंत्री म्हणून मिरविणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे अंदाज यानिमित्ताने खरे ठरले, असे कंगनाने म्हटले आहे.

कार्यालयानंतर कंगनाच्या फ्लॅटवर बीएमसीची नजर

मुंबई महापालिकेने दिवाणी न्यायालयाकडे कंगना रणौतचे खारमधील घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. पालिकेचे म्हणणे आहे की कंगनाच्या फ्लॅटमध्ये आठ ठिकाणी अवैध बांधकाम करण्यात आले आहे. मुंबईतील खार रोड पश्चिम भागात 16 व्या रोडवर डिब्रीझ अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर कंगनाचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने २०१८ मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती. मुंबई महापालिकेच्या एमआरटीपी नोटीस विरोधात तिने दिंडोशी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टाने कंगनाची बाजू ऐकून घेत पुढील कारवाईस स्टे दिला होता, तर पालिकेला यावर सविस्तर बाजू मांडण्यास सांगितले होते.

कंगनाची जीभ घसरली

महापालिकेने केलेल्या पाडकामाच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत, ‘आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल. हा काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो,’ असे म्हणत बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ यानिमित्ताने उघड झाल्याचा आरोपही केला.

माझ्यापुरता विषय संपला - संजय राऊत

कंगनाप्रकरणी बुधवारी दुपारपर्यंत मौन बाळगणाऱ्या संजय राऊत यांनी त्यानंतर माध्यमांशी बोलताना, ‘मी कधीच कंगनाला धमकावले नव्हते. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्याबद्दलचा माझा राग मी व्यक्त केला होता. आज पालिकेने जी कारवाई केली त्याच्याशी माझा संबंध नाही. माझ्यापुरता हा विषय संपला आहे. मुंबईत कंगनाचे स्वागत आहे, ती येथे राहायला मोकळी आहे,’ असे राऊत स्पष्ट केले. याबाबतची पोस्टही त्यांनी ट्विटरवर शेअर केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेKangana Ranautकंगना राणौतShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे