शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात लढणार निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 18:46 IST

बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

नवी दिल्ली- बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपानं त्यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अखिलेश प्रसाद सिंह यांनी दिली आहे.अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले, शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला सकाळी 11.30 वाजता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांचा भाजपानं पत्ता कट केल्यानंतर काँग्रेस त्यांच्या संपर्कात होता. 28 मार्चला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत शत्रुघ्न सिन्हा पक्षात प्रवेश करणार असून, पटना साहिबमधून ते रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. गेल्या आठवड्यात भाजपानं बिहारमधील एनडीएच्या 40 उमेदवारांची नावं जाहीर केली होती. ज्यात पटना साहिबमधून भाजपानं रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे.2014मध्ये मोदींचं सरकार सत्तेवर आल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा वारंवार भाजपाविरोधात बोलत होते. राफेलच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच राफेल करारातील मोदींच्या सहभागासंदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. शत्रुघ्न सिन्हांनी भाजपा सोडण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपामध्ये नाराज आहेत. ट्विट करत त्यांनी मोदींना इशाराही दिला आहे. मोहब्बत करने वाले कम न होंगे, (शायद) तेरी महफिल में लेकिन हम न होंगे, असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा