शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

Sanjay Raut: नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार योग्य, काँग्रेस अनेक राज्यांत इतिहासजमा; संजय राऊतांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 13:45 IST

Sanjay Raut talk on Narendra modi vs Sharad pawar, Prashant kishore, Congress politics: निवडणूक राष्ट्रपती पदाची, पंतप्रधान किंवा अन्य कशाची असेल. आपल्या देशात विरोधकांची एकजूट हीच एक गहण समस्या आहे. राज्यातला विरोधी पक्ष बादशाह मानतो. मी सांगेन तेच आणि तोच नेता. या विरोधकांची एकजूट होणे गरजेचे आहे, परंतू त्यांना एक नेता असणे आवश्यक आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी विरोधकांकडे कोणताही चेहरा नाहीय. जोवर विरोधकांकडे असा चेहरा येत नाही, तोवर कोणतीच संधी नाही असे वक्तव्य शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केले आहे. याचवेळी राऊतांनी शरद पवारांसाठी (Sharad Pawar) जोरदार बॅटिंग केली आहे. तर काँग्रेस (Congress) हा इतिहासजमा झालेला पक्ष असल्याचे म्हटल्याने नवा वाद ओढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Sanjay Raut Says congress became histry in many states, Sharad pawar can fight PM Narendra Modi in 2024 Election.)

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना भेटले. यावर राऊतांना विचारले असता, त्यांनी टीएमसी नेत्यांनी प्रशांत किशोर यांच्यामुळे मदत झाल्याचे सांगितले आहे. गांधी कुटुंबाशी भेट झाली, परंतू शरद पवार किंवा गांधींकडून यावर स्पष्टता आली नाही. ते नक्की काय करतायत हे समजलेले नाही. 2024 मध्य़े कोणत्याही चेहऱ्याशिवाय मोदींना हरविणे कठीण असेल. यासाठी शरद पवार योग्य आहेत, असे राऊत म्हणाले. (Prashant Kishor, Sharad pawar meet)निवडणूक राष्ट्रपती पदाची, पंतप्रधान किंवा अन्य कशाची असेल. आपल्या देशात विरोधकांची एकजूट हीच एक गहण समस्या आहे. राज्यातला विरोधी पक्ष बादशाह मानतो. मी सांगेन तेच आणि तोच नेता. या विरोधकांची एकजूट होणे गरजेचे आहे, परंतू त्यांना एक नेता असणे आवश्यक आहे, असे राऊत म्हणाले. 

शरद पवारांनी विरोधकांना एकत्र करण्यात अनेकदा महत्वाची भूमिका निभावली आहे. ते योग्य आहेत. ममता बॅनर्जीदेखील टक्कर देतील असे अनेकांना वाटत आहे. सर्व विरोधकांनी एकत्र बसल्याशिवाय हा तिढा सुटणार नाही. प्रशांत किशोर हे तो चमत्कार करणार असतील तर चांगलेच आहे, असे देखील राऊत यांनी सांगितले. 

नाना पटोले फारसे चर्चेत नाहीत...नाना पटोले जे काही बोललेत त्याचा सरकारच्या स्थिरतेवर होईल असे वाटत नाही. शेवटचा निर्णय सोनिया गांधी घेतील. काँग्रेसला जर वाटत असेल स्वबळावर लढावे, तर शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष एकत्र लढेल, असे संकेत राऊतांनी दिले. काँग्रेसला जाब विचारण्याच अधिकार हा पवारांना आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला विचारणा केली असेल, त्याच्याशी शिवसेनेचा संबंध नाही, असे देखील राऊतांनी स्पष्ट केले. 

काँग्रेस काही राज्यांत इतिहासजमा...काँग्रेस पक्ष हा 100 वर्षांहून जुना पक्ष आहे. ऐतिहासिक पक्ष आहे. परंतू आताची परिस्थिती पाहता काँग्रेस काही राज्यांत इतिहासजमा झाला आहे. नाना पटोलेंची वक्तव्ये फारशी चर्चेत नसतात,  असे वक्तव्य संजय राऊतांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसPrashant Kishoreप्रशांत किशोर