शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

"पाच वर्षं कुठलं; हे सरकार पुढचं वर्षभरही टिकणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 10:51 IST

लॉकडाऊन घोषित केले आहे पण त्याच पालन कुठे होत आहे? मुंबईतल्या काही भागात आजही लॉकडाऊनचं पालन होत नाही मग सरकारी अधिकारी करतायेत काय? असे विविध प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले.

ठळक मुद्देकोरोनाची परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं आहेमहाराष्ट्रात सरकार बदलल्याशिवाय कोरोना मृत्यू थांबणार नाहीतघरात बसून सरकार चालवता येतं का? सरकारी यंत्रणेवर कोणताही अंकुश नाही

मुंबई – राज्यात भाजपा चांगले सरकार देऊ शकते, महाराष्ट्राच्या इतिहासात घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही, भाजपा सरळ मार्गाने सत्तेवर यायला तयार आहे. या सरकारमध्ये अंतर्गत इतके वाद आहेत की सरकार एक वर्ष तरी चालेल का? याची शंका आहे. तिन्ही पक्षांचे एकमेकांसोबत वाद आहेत. कोणाचं कोणाला पटत नाही असं सांगत भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर प्रहार केला आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं आहे. मुंबईत ४ हजारापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे, याला जबाबदार कोण? रोज नवीन आदेश काढले जात आहेत पण अंमलबजावणी होताना दिसत नाही, महाराष्ट्रात सरकार बदलल्याशिवाय कोरोना मृत्यू थांबणार नाहीत. बेजबाबदारपणे सरकार वागत आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच राज्यातील जनता सुरक्षित नाही, देशात सर्वाधिक भयंकर परिस्थिती राज्यात आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. रुग्णांची अवस्था काय आहे? ना औषध ना उपचार ना काही, सरकारमध्ये कोरोनावर मात करण्याची क्षमता नाही, लोकांचे व्यवहार बंद आहेत, लोक त्रस्त झालेत, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे काय? घरात बसून सरकार चालवता येतं का? सरकारी यंत्रणेवर कोणताही अंकुश नाही, सपशेल अपयशी ठरलं आहे. लॉकडाऊन घोषित केले आहे पण त्याच पालन कुठे होत आहे? मुंबईतल्या काही भागात आजही लॉकडाऊनचं पालन होत नाही मग सरकारी अधिकारी करतायेत काय? असे विविध प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले.

शरद पवार काहीही घडवू शकतात...

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावरुन प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की, शरद पवार प्रस्ताव देतात ते एकाच पक्षाला देतात यावर विश्वास कितपत ठेवावा, हे विचार करावं असा सल्ला त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. जे झालं ते झालं त्याला इतिहास साक्ष आहे, पवारांकडून राजकीय आणि सरकारबद्दल प्रस्ताव येतात ते आपल्यालाच दिला असेल असं विश्वास ठेऊन पुढे जाऊ नये असं मला वाटतं. चीनच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी राष्ट्रीय भावनेतून नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला असेल, त्यांचे विधान काँग्रेसला एकाकी पाडण्याबाबत नसावं, पण शरद पवार काहीही घडवू शकतात असं सूचक विधान नारायण राणे यांनी केलं आहे.

टॅग्स :BJPभाजपाState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSharad Pawarशरद पवारNarayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस