शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या मालकांसाठी प्रार्थना करा! भाजपाच्या जेष्ठ नेत्याला कोरोनाची लागण; नातवाची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 19:51 IST

गेली ५० वर्षे सुधाकर परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यात आपला राजकीय ठसा उमटवला आहे.

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक राजकीय नेते मंडळींनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता यात सोलापूरातील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. पुण्यातील एका रुग्णालयात सुधाकर परिचारक यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गेली ५० वर्षे सुधाकर परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यात आपला राजकीय ठसा उमटवला आहे. सध्या त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्या प्रार्थनेची गरज असल्याचं त्यांचा नातू प्रितीश परिचारक यांनी आवाहन केले आहे. सध्या सुधाकर परिचारक यांचे वय ८५ आहे. त्यांच्यावर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुधाकर परिचारक यांच्या तब्येतीबद्दल त्यांचा नातू प्रितीशने फेसबुकवर पोस्ट केले आहे.

काय आहे फेसबुक पोस्टमध्ये?

गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करत असताना परिचारक कुटुंबातील अनेक जणांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. सर्व जण त्यांच्या लक्षणांनुसार योग्य ते उपचार घेत आहेत. सर्व जण डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून व गरज भासल्यास COVID विलगिकरण वॉर्डसमध्ये यशस्वी उपचार घेत आहेत.

आपल्या सर्वांचे दैवत असलेल्या मोठ्या मालकांवर पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम कडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यांमुळे त्यांची ही कोरोनाची लढाई कठीण होत आहे. गेली ५० वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे. त्यांच्या इच्छाशक्तीवर आणि आपल्या प्रार्थनेच्या बळावर ते ही लढाई ही जिंकतील अशी आशा करूयात.

वकील साहेब, प्रशांत मालक, उमेश काका, प्रणव दादा व इतर सर्व परिचारक कुटुंबियांची प्रकृती स्थिर आहे.

धन्यवाद.

कोण आहेत सुधाकर परिचालक?

सुधाकर परिचारक हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते त्यानंतर त्यांनी आणि त्यांचा पुतण्या प्रशांत परिचारक यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. सुधाकर परिचालक हे एसटी महामंडळाचे अध्यक्षही होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परिचालक हे महायुतीकडून उभे राहिले होते. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सलग २० वर्ष सुधाकर परिचारक यांनी पंढरपूरचं प्रतिनिधित्व केले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsudhakar paricharakसुधाकर परिचारकBJPभाजपा