शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

"ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहा’’ शिवसेनेचा मोदी आणि भाजपाला टोला

By बाळकृष्ण परब | Published: November 09, 2020 8:09 AM

US Election 2020 News : ट्रम्प यांनी जनतेने दिलेला कौल ठोकरून जे तांडव सुरू केले आहे ते भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघड्या घातल्या गेल्या. हे विसरता येत नाही. चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहण्याची आपली संस्कृती नाही. मात्र तसे पायंडे पाडले जात आहेत.

ठळक मुद्देभारताने नमस्ते ट्रम्प म्हटले असले तरी सुज्ञ अमेरिकन जनतेने ट्रम्प यांना बाय बाय करून आपली चूक सुधारली बिहारमध्येही पुन्हा जंगलराज येईल ही भीती झुगारत आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू, असे स्पष्ट सांगितलेजो बायडेन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष हा अन्याय, असत्य आणि ढोंगशाहीविरुद्धचा होता. तो यशस्वी होताना दिसत आहे

मुंबई - अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल आणि बिहारमधील एक्झिट पोलमधून मिळत असलेल्या सत्तांतराच्या संकेतांवरून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. भारताने नमस्ते ट्रम्प म्हटले असले तरी सुज्ञ अमेरिकन जनतेने ट्रम्प यांना बाय बाय करून आपली चूक सुधारली आहे. तर बिहारमध्येही पुन्हा जंगलराज येईल ही भीती झुगारत आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू, असे स्पष्ट सांगितले. अमेरिका आणि बिहारमधील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. जनता हीच श्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान आहे. जो बायडेन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष हा अन्याय, असत्य आणि ढोंगशाहीविरुद्धचा होता. तो यशस्वी होताना दिसत आहे, असे सामनाच्या आजच्या अग्रलेखलात म्हटले आहेअमेरिकेत सत्तांतर झालेच आहे. बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव होताना स्पष्ट दिसत आहे. आपल्याशिवाय देशाला किंवा राज्याला पर्याय नाही, या भ्रमातून बाहेर काढण्याचे काम जनतेलाच करायचे आसते. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कधीच लायक नव्हते. मात्र त्यांच्या माकडचेष्टा आणि थापेबाजीस जनता भुलली. मात्र ट्रम्प यांच्याबाबत केलेली चूक अमेरिकन जनतेने चार वर्षांत सुधारली. त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच, अशा शब्दात सामनाने अमेरिकन जनतेने दिलेल्या कौलाचे कौतुक केले आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती अमेरिकेची सूत्रे चार वर्षे होती आणि भारतातील भाजपा पुढारी आणि राज्यकर्ते नमस्ते ट्रम्पसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत होते. ट्रम्प यांना ऐन कोरोनाकाळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला. त्यातून कोरोनाचा संसर्ग पसरला हे नाकारता येत नाही. मात्र आता अमेरिकेच्या लोकांनी ट्रम्प यांचे संक्रमण सोपवले ते कायमचेच. ट्रम्प यांनी जनतेने दिलेला कौल ठोकरून जे तांडव सुरू केले आहे ते भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघड्या घातल्या गेल्या. हे विसरता येत नाही. चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहण्याची आपली संस्कृती नाही. मात्र तसे पायंडे पाडले जात आहेत. ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहावे. इतकेच आता म्हणता येईल, असा टोला सामानामधून मोदी आणि भाजपाला लगावण्यात आला आहे.

आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड झाली आहे. कमला हॅरिस यांची वैयक्तिक पातळीवर निंदानालस्ती करण्याचा प्रकार ट्रम्प यांनी केला. अशा ट्रम्प यांचे सगळ्यात मोठे पाठीराखे पंतप्रधान मोदी आणि भाजपावाले होते. आता कमला हॅरिस यांच्या विजयाचा आनंद जगभरातील भाजपाईंना झाला असेल तर ते ढोंग आहे, असा चिमटाही सामनामधील अग्रलेखातून काढण्यात आला.

 

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा