शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

"गोवर्धन पर्वत वाचवा, अन्यथा उद्या मोदी तोसुद्धा विकून टाकतील", प्रियंका गांधींचा घणाघात

By बाळकृष्ण परब | Published: February 23, 2021 4:39 PM

Priyanka Gandhi lashes out BJP & Central Government farm law : कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरून आता राजकारण अधिकच तीव्र झाले आहे.

मथुरा - कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरून (Farmers Protest) आता राजकारण अधिकच तीव्र झाले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh ) शेतकरी महापंचायतींचे आयोजन केले जात आहे. आज मथुरेतील पालीखेडा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या अशाच एका महापंचायतीला प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी संबोधित केले. तसेच यावेळी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. ("Save Govardhan Parvat, otherwise Modi Government will sell it tomorrow", Priyanka Gandhi lashes out BJP & Central Government )मोदींवर जोरदार टीका करताना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख अहंकारी आणि भेकड असा केला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आधीच्या सरकारांनी जर काहीच केलं नाही तर मोदी विकत काय आहेत. तुमच्या सरकारने केवळ नोटाबंदी आणि जीएसटी तयार केला. त्यामुळे जनता त्रस्त आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच जोपर्यंत तीन कृषी कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरू राहील. तसेच आमचे सरकार येताच हे कायदे रद्द केले जातील, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिले.प्रियंका गांधी यांनी म्हणाल्या की, मोदी सरकारने एलआयसीशिवाय अनेक अन्य कंपन्या विक्रीस काढत आहे. आता तुम्ही गोवर्धन पर्वत वाचवा, नाहीतर मोदी सरकारा उद्या तोसुद्धा विकून टाकेल. मोदींचे शेतकऱ्यांसोबत नेमके कोणते वैर आहे ते कळत नाही. मोदी संसदेत शेतकऱ्यांचा अवमान करतात. त्याचे मंत्री शेतकऱ्यांना दहशतवादी बोलतात. जेव्हा संसदेत राहुल गांधींनी संसदेत मौन पाळले तेव्हा सरकारने त्यामध्ये सहभाग घेतला नाही.मथुरेची ही भूमी अहंकार मोडून काढते. भाजपा सरकारनेसुद्धा अन्नदात्याविरोधात अहंकार बाळगला आहे. ९० दिसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपली लढाई लढत आहेत. २०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या काळात मोदी जगभरात सगळीकडे पोहोचले. मात्र त्यांना या शेतकऱ्यांची भेट घेता आली नाही, असा सवाल प्रियंका गांधींनी विचारला.प्रियंका गांधी म्हणाल्या की, या सरकारचा विवेक मेला आहे. भगवान श्रीकृष्ण यांचासुद्धा अहंकार तोडणार आहेत. प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी आपल्यासाठी दोन विमाने खरेदी केली. मात्र शेतकऱ्यांची थकीत रक्कम दिली नाही. या सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल-डिझेलचे दरही वाढत आहेत.

 

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण