शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

"उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर..."; कंगनाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 16:18 IST

अयोध्येतील संतांनी कंगनाचं समर्थन केलं असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

नवी दिल्ली - मुंबईत सुरू असलेल्या कंगना राणौत आणि शिवसेनेमधील वादाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने करवाई केल्यानंतर आता कंगनाविरोधात ड्र्ग्स केसची चौकशीही होणार आहे. याच दरम्यान या प्रकरणी आता विश्व हिंदू परिषदेनं कंगनाची बाजू घेतली आहे. अयोध्येतील संतांनी कंगनाचं समर्थन केलं असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये. यापुढे अयोध्येत उद्धव ठाकरेंचं स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार" असल्याचं म्हटलं आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी कंगनाला देशाची मुलगी म्हटलं असून उद्धव ठाकरेंना अयोध्येत न येण्याचा सल्लावजा इशारा दिला आहे. हनुमान गढी मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचा विरोध केला आहे. तसेच कार्यालय तोडून चांगलं नाही असं म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे कोणतेही नेते अयोध्येत आले तर त्यांचं कोणतंही स्वागत होणार नाही. अयोध्येतील संतांच्यां विरोधाचा त्यांना सामना करावा लागेल असं देखील म्हटलं आहे. कंगना खूप शूर आहे. तिने बॉलिवूडमधील माफीया आणि ड्रग्ज माफियांविरोधात आवाज उठवला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र पालघरमध्ये झालेल्या दोन साधुंच्या हत्ये प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कोणतीही कारवाई  केलेली नाही असं ही त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'अयशस्वी' मुख्यमंत्री, त्यांनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं"

भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात 'अयशस्वी' मुख्यमंत्री आहेत असं म्हणत भाजपाने हल्लाबोल केला आहे. बिहार भाजपाचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेनं आपलं नाव बदलून 'बाबर सेना' करावं असं देखील म्हटलं आहे. यासोबतच यशस्वी मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं असा सल्लाही निखिल आनंद यांनी दिला आहे. 

"उद्धव ठाकरे इतक्या खालच्या पातळीवर जाणारे व्यक्ती असतील हे जनतेला माहीत नव्हतं"

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतके खालच्या पातळीवर जाणारे राजकीय व्यक्ती असतील हे देशाच्या जनतेला माहीत नव्हतं. गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत बडबड करत आहेत आणि सोबतच मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका पक्षपाती कारवाई करत आहेत, ती थेट उद्धव ठाकरेंच्या निर्देशावरून आणि इशाऱ्यावरूनच होत आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा आणि विचारधाराही पणाला लावली" असं निखिल आनंद यांनी म्हटलं आहे. 

कंगनाची आगपाखड, तर शिवसेनेचे मौन; मनपाकडून कारवाईचे समर्थन

अभिनेत्री कंगना रनौत हिने गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिका आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेवर शिवसेना उभी केली, तीच विचारधारा सत्तेसाठी विकून शिवसेनेची सोनिया सेना बनली आहे, अशा शब्दांत कंगनाने शाब्दिक फटकारे लगावले. मात्र त्याला शिवसेनेकडून तिला काहीच प्रत्युत्तर देण्यात आले नाही. तर दुसरीकडे, कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईचे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात समर्थन केले. न्यायालयाने पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी ठेवली.

महत्त्वाच्या बातम्या

"महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास", मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात...

अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार, एकाच बटणाने व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंग करता येणार

"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल

CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा

CoronaVirus News : बापरे! मे महिन्यापर्यंत तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, ICMRचा धक्कादायक खुलासा

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्याMumbaiमुंबई