शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
5
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
6
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
7
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
8
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
9
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
12
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
13
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
14
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
15
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
16
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
17
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
18
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
19
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणावरून दिल्लीत खलबतं; रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 12:48 IST

Mukesh Ambani Bomb Scare, Devendra Fadnavis meet PM Narendra Modi, Amit Shah: या प्रकरणावर फडणवीसांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेण्यासाठी २०१८ मध्ये खुद्द आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन करून दबाव आणला होता असा गौप्यस्फोट केला.

ठळक मुद्देपत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलीराज्यात पुढे काय करायचं याचा फायदा घेता येईल का? अशी चर्चा या भेटीत झाल्याची शक्यताया प्रकरणात फक्त सचिन वाझे एकटे नाहीत, तर अनेक जण यात सहभागी आहेत, हे मुंबई पोलिसांचे अपयश नाही तर महाराष्ट्र सरकारचं अपयश

नवी दिल्ली – राज्यात सुरु असलेल्या सचिन वाझे(Sachin Vaze) प्रकरणामुळे दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती,(Mukesh Ambani Bomb Scare) या प्रकरणाचा तपास NIA कडून सुरु आहे, यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे, त्यानंतर ठाकरे सरकारनं वाझेंचे निलंबन केले. या प्रकरणामुळे ठाकरे सरकारची कोंडी झाली असून विरोधक आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.(BJP Devendra Fadnavis meet with PM Narendra Modi & Amit Shah over Sachin Vaze Case)  

यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) सध्या दिल्लीत बुधवारी दिल्लीत होते, या प्रकरणावर फडणवीसांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेण्यासाठी २०१८ मध्ये खुद्द आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन करून दबाव आणला होता असा गौप्यस्फोट केला. या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा(Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. त्यामुळे राज्यात पुढे काय करायचं याचा फायदा घेता येईल का? अशी चर्चा या भेटीत झाल्याची शक्यता आहे, अशी बातमी एबीपीने दिली आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

मी मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये निलंबित एपीआय सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव होता, मला उद्धव ठाकरेंचा(Uddhav Thackeray) फोन आला होता, शिवसेनेचे दोन मंत्रीही भेटले होते, परंतु या प्रकरणात मी वाझेंची फाईल तपासली, त्यानंतर त्यावेळी अँडव्होकेट जनरलचा सल्ला घेतला, तेव्हा वाझेंना घेणं योग्य राहणार नाही, कारण हायकोर्टात त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरु होती असं मला सांगण्यात आला, हा सल्ला लेखी नव्हता तर तोंडी होता, म्हणून मी त्यांना पोलीस दलात पुन्हा घेतलं नाही असा दावा फडणवीसांनी केला होता. त्याचसोबत सचिन वाझे यांनी २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला, ते शिवसैनिक म्हणून काम करत होते, काही शिवसेनेच्या नेत्यांसोबत त्यांचे व्यवसायिक संबंध आहेत, राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आल्यानंतर कोरोना काळात आढावा कमिटीचा अहवाल बनवण्यात आला, यात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेतलं. सचिन वाझे यांना सोडून कोणत्याही अधिकाऱ्याला सरकारनं पोलीस सेवेत पुन्हा रुजू केलं नव्हतं असंही फडणवीस म्हणाले.

राजकीय बॉस कोण?

या प्रकरणात फक्त सचिन वाझे एकटे नाहीत, तर अनेक जण यात सहभागी आहेत, हे मुंबई पोलिसांचे अपयश नाही तर महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे, सचिन वाझेंचा इतिहास चांगला नसताना त्यांना इतक्या महत्त्वाच्या पदावर बसवलं का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेंचा बचाव करताना दिसत होते, या प्रकरणाच्या खोलाशी जाणं गरजेचे आहे, ज्यासाठी सचिन वाझेंना पोलीस सेवेत परत घेतलं त्या हेतूचा शोध घेणंही गरजेचं आहे असं सांगत सचिन वाझेला ऑपरेट कोण करत होतं? हे बाहेर यायला हवं अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाMukesh Ambaniमुकेश अंबानी