शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Sachin Vaze: सरकार कोंडीत, विरोधक आक्रमक; अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 07:19 IST

‘लेटर बॉम्ब’चे तीव्र पडसाद, यातून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांचे बैठक सत्र सुरू आहे.

मुंबई/नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले गंभीर आरोप आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेचा सहभाग स्पष्ट झाल्याने महाविकास आघाडी सरकारची पुरती कोंडी झाली आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन छेडले असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तो चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.    

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळणे, नंतर या गाडीची मालकी असलेले मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू, हिरेन यांच्या हत्येत सचिन वाझे याचा सहभाग असल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट होणे व आता परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवर पैसे वसुलीचा आरोप करणे, या घटनांमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला धारेवर धरले असून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

यातून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांचे बैठक सत्र सुरू आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवारांची भेट घेऊन चर्चा केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख हेही उद्या दिल्लीत पोहोचत आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पवारांनी फोनवर चर्चा केली. 

बदल्यांच्या रॅकेटचा अहवाल लपविला : फडणवीस तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनीदेखील सरकारकडे खळबळजनक अहवाल सादर केला होता. तपासानंतर पोलीस बदल्यांचे रॅकेट उघडकीस आले होते. त्याचे पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले होते. मात्र, तो स्फोटक अहवाल शासनाने लपविल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सत्तेपुढे शहाणपण नसते : राऊत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप सनसनाटी आणि खळबळजनक आहेत. त्यामुळे त्यातील सत्यतेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा चांगली  राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, या संपूर्ण प्रकरणात काही गोष्टींवर योग्य वेळी निर्णय घेणे अपेक्षित होते. सत्तेपुढे शहाणपण नसते, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी लेटर बॉम्ब प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. 

आरोप गंभीर, चौकशी  झाली पाहिजे - शरद पवारमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी राजधानीत व्यक्त केले. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे आणि गृहमंत्र्यांवरील कारवाईबाबत योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारsachin Vazeसचिन वाझेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुख