शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
5
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
8
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
9
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
10
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
11
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
12
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
13
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
15
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
16
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
17
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
18
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
19
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
20
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

Sachin Vaze : "सचिन वाझे आणि अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचे कनेक्शन मातोश्रीवर’’ मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 17:18 IST

Sachin vaze Case : सचिन वाझे यांना राज्य सरकार पाठीशी घातल होते, असा आरोप करत विरोधक ठाकरे सरकारविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. तर आता सचिन वाझे आणि अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचे कनेक्शन हे मातोश्रीवर असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. (Navneet Rana makes serious allegations against CM Uddhav Thackeray)

ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरण आणि मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचे धागेदोरे मातोश्रीवर आहेतमुंबई पोलीस का दबावात होते, कुणाच्या दबावात होते. तपास योग्य पद्धतीने का होत नव्हता. याचा शोध घेतला तर या सर्वांच्या तारा मातोश्रीवर जुळलेल्या दिसून येतीलआता लवकरच या प्रकरणात दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानासमोर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यापासून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कोंडी झाली आहे. या प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vaze) यांना राज्य सरकार पाठीशी घातल होते, असा आरोप करत विरोधक ठाकरे सरकारविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. तर आता सचिन वाझे आणि अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचे कनेक्शन हे मातोश्रीवर असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. (''Connection of explosives found near Mukesh Ambani's house In Matoshri '' Navneet Rana makes serious allegations against CM Uddhav Thackeray)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आहेत. त्या म्हणाल्या की, सचिन वाझे प्रकरण आणि मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचे धागेदोरे मातोश्रीवर आहेत. मुंबई पोलीस का दबावात होते, कुणाच्या दबावात होते. तपास योग्य पद्धतीने का होत नव्हता. याचा शोध घेतला तर या सर्वांच्या तारा मातोश्रीवर जुळलेल्या दिसून येतील. मातोश्राच्या कनेक्शनसोबत याचे कनेक्शन काही ना काही आहे. हे स्पष्टपणे लोकांना दिसून येत आहे. एनआयएच्या माध्यमातून ते स्पष्टपणे समोर येत आहे. आता लवकरच या प्रकरणात दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल, असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. 

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत असून, त्याबरोबरच महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्येही भर पडत आहे. या वादामुळे सरकारवर ओढवलेल्या नामुष्कीमधून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासह राज्य सरकारमधील बड्या नेत्यांच्या वारंवार बैठका होत आहे. 

या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाईल, असा चर्चा काल राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने भक्कमपणे अनिल देशमुख यांच्या मागे उभे राहत, त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाnavneet kaur ranaनवनीत कौर राणा