शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"उघड डोळे बघ नीट केशवा...", उपाध्येंना सचिन सावंतांचे काव्यात्मक शैलीत उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 15:17 IST

Sachin sawant : सचिन सावंत यांनी हे सरकार अजब नसून, गजब असल्याचा दावा केला आहे.  

ठळक मुद्देयाआधी केशव उपाध्ये यांनी सरकार कंत्राटदार, आणि विकासक धार्जिणे असल्याची टीका केली आहे.

मुंबई : राज्यातील बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर महाविकास आघाडीवर भाजपाकडून टीका होत आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून 'उद्धवा अजब तुझे सरकार' म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली.

यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उघड डोळे बघ नीट केशवा, तुझा शब्दच्छल आहे फसवा, समाधानी आज राज्यातला बापडा, म्हणतोय, महाविकास आघाडी ‘छे आपडा’ असे सांगत केशव उपाध्येंना उत्तर दिले आहे. तसेच, ट्विटरच्या माध्यामातून सचिन सावंत यांनी हे सरकार अजब नसून, गजब असल्याचा दावा केला आहे.  

"उघड डोळे बघ नीट केशवा,तुझा शब्दच्छल आहे फसवाअरे अजब नव्हे, गजब आहे हे सरकार,नाठाळांच्या माथी धोंडा अन्जनतेला मणिहारमोदी कृपेने करोडो झाले बेरोजगारभाजपासाठी बिल्डर असे मलिदा, आमच्यासाठी बांधकाम क्षेत्र जनतेला रोजगारसमाधानी आज राज्यातला बापडा,म्हणतोय, मविआ छे आपडा", असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

दरम्यान, याआधी केशव उपाध्ये यांनी सरकार कंत्राटदार, आणि विकासक धार्जिणे असल्याची टीका केली आहे. राज्यातील नागरिकांच्या नशिबी कोंडा आला असून कंत्राटदारांना मात्र मणीहार घातला जात आहे, असे केशव उपाध्ये यांनी काव्यमय शैलीत म्हटले आहे. 'उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणत त्यांनी मंत्र्यांच्या गाड्यांना सरकार पैसे देते. कंत्राटदारांची बिलं द्यायला सरकारकडे पैसै आहेत. मात्र, मुंबईकरांना मालमत्ता करात सवलत मिळत नाही. वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नसल्याची टीका केली आहे.

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतBJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे