शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

RSS लग्नाला कंत्राट समजते, त्यावर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांचे म्हणणं काय? नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 12:12 IST

nana patole criticizes bjp over rss ideology of marriage : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यावरून नाना पटोले यांनी भाजपाला टोला लगावला.

ठळक मुद्देसोमवारी विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी नाना पटोले यांनी संवाद साधला.नाना पटोले यांनी नाणारवरूनही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांची मातृसंस्था असलेली आरएसएस लग्नाला कंत्राट समजते, त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे, असा सवाल नाना पटोले केला आहे. (nana patole criticizes bjp over rss ideology of marriage) 

सोमवारी विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी नाना पटोले यांनी संवाद साधला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यावरून नाना पटोले यांनी भाजपाला टोला लगावला. भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आंदोलन करत आहेत. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांची मातृसंस्था असलेल्या संघाचे मत काय आहे. ते लग्नाला कंत्राट समजतात, त्यावर त्यांचे म्हणणे काय आहे, असे नाना पटोले म्हणाले.

याचबरोबर, नाना पटोले यांनी नाणारवरूनही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. नाणार प्रकल्प कोकणात होत असेल तर हरकत नाही. परंतु हा प्रकल्प कोकणात होणार नसेल तर तो विदर्भात झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे, असेही नाना पटोले म्हणाले. दरम्यान, आज विधान सभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यावरही नाना पटोले यांनी भाष्य केले. अर्थसंकल्पातून सर्वांनाच अपेक्षा असतात. चांगला अर्थसंकल्प मिळेल ही अपेक्षा असते, असे नाना पटोले म्हणाले.

पत्राद्वारे काय म्हणाले राज ठाकरे?महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी' म्हणजेच नाणार सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. 

तसेच, कोकणावर निसर्गाने सौंदर्याची जितकी मुक्त उधळण केली आहे तितकी इतर ठिकाणी फारशी आढळत नाही ह्या विषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही. प्रत्येक पर्यटन स्थळ हे एखाद्याच विशिष्ट ऋतूत खुलून दिसतं आणि इतर वेळेस ते तितकं मनाला भावत नाही. पण कोकणच्या बाबतीत मात्र निसर्गाने कमाल केली आहे. तिन्ही ऋतूत कोकण सुंदर दिसू शकतं आणि म्हणूनच पर्यटन हा कोकणाचा आणि पर्यायाने माझ्या कोकणी माणसाच्या जगण्याचा श्वास होऊ शकतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाVidhan Bhavanविधान भवन