Ramdas Athawale: 'प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, कारण...'; रामदास आठवलेंची जबरदस्त कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 02:12 PM2021-06-13T14:12:04+5:302021-06-13T14:12:32+5:30

Ramdas Athawale: रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी त्यांच्या हटके स्टाइलमध्ये कवितेच्या माध्यमातून प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटीवर निशाणा साधला.

rpi leader ramdas athawale slams prashant kishor and sharad pawar meet tweets a poem | Ramdas Athawale: 'प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, कारण...'; रामदास आठवलेंची जबरदस्त कविता

Ramdas Athawale: 'प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, कारण...'; रामदास आठवलेंची जबरदस्त कविता

Next

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून राज्याच्या राजकारणात बरीच चर्चा होत असताना आता रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी त्यांच्या हटके स्टाइलमध्ये कवितेच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. रामदास आठवले यांनी एक कविता ट्विट करुन प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची निष्फळ ठरणार असल्याचं म्हटलं आहे. 

कुणी कुणालाही भेटू द्या, येतील तर नरेंद्र मोदीच!; फडणवीसांचा पवारांना टोला

"प्रशांत किशोर यांच्या कोणी  लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी!...नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?", अशी कविता रामदास आठवले यांनी ट्विट केली आहे. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो आठवले यांनी ट्विट केला आहे. 

प्रशांत किशोर-शरद पवार भेटीवरुन चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात तब्बल तीन तास बैठक झाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं काम आता प्रशांत किशोर पाहणार असल्याचं बोललं जात होतं. पण पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हे वृत्त फेटाळून लावलं. प्रशांत किशोर पक्षाच्या प्रचाराचं नाही. पण भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. 

Web Title: rpi leader ramdas athawale slams prashant kishor and sharad pawar meet tweets a poem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app