शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत फेरबदल; के.सी पाडवी विधानसभाध्यक्ष; तर अमित देशमुख प्रदेशाध्यक्ष?

By अतुल कुलकर्णी | Updated: February 5, 2021 08:57 IST

आक्रमक नेते म्हणून पटोले यांची ओळख आहे. विधानसभाध्यक्षपदामुळे आक्रमकपणाला मुरड घालावी लागत होती.

ठळक मुद्दे. पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन  पाडवी यांना विधानसभेचे अध्यक्षपद द्यायचे असे एक नियोजन आहे. सरकार बनवतेवेळी विधानसभाध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा एकमताने निर्णय झाला होता, त्यामुळे त्यात बदल होणार नाही.पटोले यांना मंत्रिपद आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद द्यायचे, की फक्त मंत्रिपद द्यायचे? यावरदेखील खल सुरू

अतुल कुलकर्णीमुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त जागेवर आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची तर प्रदेशाध्यक्षपदासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या नावांची चर्चा आहे. नाना पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

आक्रमक नेते म्हणून पटोले यांची ओळख आहे. विधानसभाध्यक्षपदामुळे आक्रमकपणाला मुरड घालावी लागत होती. काँग्रेस वाढवायची असेल तर मोठे बदल करावे लागतील यावर पक्षात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यात पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशी मागणी केल्याचे समजते. प्रत्यक्षात पडद्यामागे वेगळ्या हालचाली घडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन  पाडवी यांना विधानसभेचे अध्यक्षपद द्यायचे असे एक नियोजन आहे. यानिमित्ताने विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मान आदिवासी समाजाला पहिल्यांदाच दिला जाईल. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, सरकार बनवतेवेळी विधानसभाध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा एकमताने निर्णय झाला होता, त्यामुळे त्यात बदल होणार नाही.

खल सुरू....पटोले यांना मंत्रिपद आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद द्यायचे, की फक्त मंत्रिपद द्यायचे? यावरदेखील खल सुरू आहे. अमित देशमुख यांना मंत्रिपद आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशीही मागणी पुढे आली आहे. अमित देशमुख हे पटोले यांच्या तुलनेने कमी आक्रमक आहेत. तीन पक्षांचे सरकार चालविताना आक्रमकपणा अडचणीचा होऊ शकतो, असा एक सूर पुढे आला आहे.  सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात असे दोन गट आहेत.  चव्हाण गटाला अमित देशमुख नको आहेत तर थोरात यांना अमित प्रदेशाध्यक्ष झाले तर चालतील, अशी परिस्थिती आहे.

तिन्ही पक्षांना मान्य नेतामहाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील, अशी असा निर्णय झाला होता. त्यामुळे हे पद कोणाला द्यायचे याचा निर्णय काँग्रेसने घ्यायचा असला, तरी तिन्ही पक्षांना मान्य असेल असे नाव पुढे आणले जाईल. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी होते. पण पाडवी आदिवासी समाजाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाला राष्ट्रवादी आणि शिवसेना विरोध करणार नाही. यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारने आदिवासी समाजाच्या नेत्याला विधानसभेचे सर्वोच्च पद दिले, असा संदेशही देता येईल अशी चर्चा आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसAmit Deshmukhअमित देशमुखNana Patoleनाना पटोले