शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

By मोरेश्वर येरम | Updated: November 25, 2020 17:29 IST

संजय राऊत यांनी सध्याच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि भाजपविरोधात बोलणं हा गुन्हा आहे, असं वक्तव्य केलं होतं.

ठळक मुद्देसंजय राऊत यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी दिलं प्रत्युत्तर''राज्यात काही घडलं की त्यामागे भाजपचा हात असल्याची विरोधकांची विचारसरणी''चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्द्यांतून साधला सेनेवर निशाणा

मुंबईभाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याचं सत्र काही थांबताना दिसत नाहीय. यात भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेकडून संजय राऊत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता राऊत यांच्यावर पलटवार केलाय. ''भाजपवर टीका केल्याशिवाय संजय राऊत यांना झोप देखील लागत नसेल'', असं म्हटलंय. 

भाजप नेत्यांच्या चौकश्या होणार?; संजय राऊतांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

संजय राऊत यांनी सध्याच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि भाजपविरोधात बोलणं हा गुन्हा आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईवरुनही राऊत यांनी ईडीसोबतच भाजपवरही शरसंधान केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर पलटवार केला आहे. 

तुम्हाला ईडीची नोटीस आली का?; हडप्पा, मोहंजोदडोचा संदर्भ देत राऊत म्हणाले...

"राज्यात कोणतीही घटना घडली तर त्यात केवळ भाजपचा हात असतो, अशा विचारसरणीची ही विरोधक मंडळी आहेत. त्यात संजय राऊत यांना भाजपवर टीका केल्याशिवाय झोपदेखील लागत नसेल. स्वत:चा पराभव समोर दिसू लागला की यांचं टीकास्त्र आपोआप सुरू होतं'', असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. 

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये मांडलेले मुद्दे...>> राज्यात काही झालं, पाऊस कमी-जास्त पडला तरी त्यात भाजपचा हात आहे, असं प्रत्येक वेळेस राज्य सरकारला वाटतं>> संजय राऊतांना भाजपवर दिवसभरातून १० वेळा टिका केल्याशिवाय झोपच लागत नाही. >> मला खरं बोलण्याची आणि वस्तुस्थिती मांडण्याची सवय आहे, स्वप्नात रमण्याची नाही! त्यामुळे मी असं म्हटलं की, माझ्यावर वारंवार टीका करुन तुम्हाला शरद पवार मुख्यमंत्री करणार नाही, मुख्यमंत्री करण्याची वएळ आली तर ते सुप्रियाताईला मुख्यमंत्री करतील. >> महाराष्ट्राच्या संस्कृतीने देशाला दिशा दिली, तर मग आता महाविकास आघाडी सरकारला कोणाच्या शरीरयष्टीवर, कोणाच्या आडनावावर बोलण्याची संस्कृती आणायची आहे का महाराष्ट्रात?>> एखाद्या यंत्रणेने राज्य सरकार प्रति अनुकूल काम केले तर ते चांगले पण त्याच यंत्रणेने चौकशी केली आणि त्यांचा त्रास झाला की त्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप राज्य सरकार करतं>> पदवीधर निवडणुकीत पराभव दिसत असल्याने जयंत पाटील यांनी पराभवाची कारणं लिहायला सुरुवात केली आहे.>> राज्य सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही ती आमची संस्कृती नाही.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार