शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पेगासस प्रकरणावरुन राज्यसभेत गोंधळ, तृणमूल काँग्रेसचे 6 खासदार एका दिवसासाठी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 14:43 IST

Monsoon Session Of Parliament: तृणमूलच्या या सहा खासदारांनी सभापती एम वेंकैया नायडूंच्या दालनासमोर गोंधळ घातला.

ठळक मुद्देया सर्व गोंधळानंतर राज्यसभेची कार्यवाही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली.

नवी दिल्ली: 19 जुलै रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सरुवात झाली आहे. पण, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून पेगास हेरगिरी, कोरोना आणि कृषी कायद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक प्रचंड गदारोळ घालत आहेत. यामुळे अनेकदा दोन्ही सभागृहाची कार्यवाही स्थगित करावी लागली आहे. आजही या मुद्यांवरुन तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातला, त्यामुळे सभापतींनी राज्यसभेच्या 6 खासदारांवर एका दिवसाच्या निलंबनाची कारवाई केी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सभापती एम वेंकैया नायडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दिलेली नोटिस स्विकार केल्याचं आणि इतर नोटिशी रद्द केल्याचं सांगितलं, त्यानंतर तृणमूलच्या या 6 खासदारंनी वेंकैया नायडू यांच्या दालनासमोर येऊन पेगासस हेरगिरी आणि इतर मुद्यांवर चर्चा करण्याची मागणी करत प्रचंड गोंधळ घातला. यानंतर वेंकैया नायडूंनी कारवाई करत या सहा खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केले. 

2 वाजेर्यंत कार्यवाही स्थगितया सर्व गोंधळानंतर राज्यसभेची कार्यवाही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. दरम्यान, या सहा खासदारांना नियम 255 अंतर्गत एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यापूर्वी नायडून यांनी काही महत्वाचे कागदपत्र सभागृहात सादर केले. तसेच, समाजवादी पार्टीचे रामगोपाल वर्मा, विश्वंभर प्रसाद निषाद आणि माकपाचे डॉ. वी शिवदासन यांच्याकडून नियम 267 अंतर्गत शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यसाठी नोटिस देण्यात आल्याचे सांगितले आणि हे मुद्दे महत्वाचे असल्यामुळे यावर चर्चा करण्याची परवानगी दिली. 

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाtmcठाणे महापालिकाFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरी