शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: ..तर माढासह १५ जागांवर लढणार- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 02:25 IST

'बुलडाणा-वर्धा जागा न दिल्यास आज उमेदवारांची यादी जाहीर करू'

पुणे : लोकसभेच्या बुलडाणा आणि वर्धा जागा स्वाभिमानी पक्षाला मिळाल्या पाहिजेत, या मागणीवर आम्ही ठाम असून, आघाडीने निर्णय न दिल्यास माढा, बारामती मतदारसंघासह १५ जागांवरील उमेदवारांची घोषणा बुधवारपर्यंत (दि. १३) करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी बालेवाडी परिसरात झाली. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माणिकराव कदम, राजाभाऊ ढवाण, घनश्याम चौधरी या वेळी उपस्थित होते. आघाडीतील जागांचा अजूनही तिढा सुटलेला नाही. आघाडीने हातकणंगले जागा स्वाभिमानीला सोडल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, या जागेवर स्वाभिमानीचे अध्यक्ष शेट्टी गेली दहा वर्षे प्रतिनिधित्व करीत आहेत.माढ्यात भाजपाकडेच उमेदवार नाहीमाढा मतदारसंघात विरोधी वातावरण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याचे वाटत नाही. उलट भारतीय जनता पक्षालाच उमेदवार नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख लोकसभा निवडणूक लढवायला तयार नाहीत. यापूर्वी त्यांनी लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत किरकोळ मते पडली होती.या जागांवरील उमेदवार तयार आघाडीने हातकणंगले मतदारसंघासह वर्धा आणि बुलडाणा दिली पाहिजे. मागणी मान्य न झाल्यास या जागांसह कोल्हापूर, माढा, सांगली, बारामती, शिर्डी, नंदूरबार, औरंगाबाद, परभणी, जालना, शिरूर आणि नाशिक या जागांवर उमेदवार तयार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaju Shettyराजू शेट्टीBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस