शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना हात?

By कुणाल गवाणकर | Updated: November 16, 2020 15:49 IST

जिल्ह्याच्या राजकारणात डावललं जात असल्यानं खोत नाराज असल्याची चर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. खुद्द सदाखाऊ खोत यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आमची विचारधारा एकच आहे. केवळ काही मुद्द्यांवरून आमच्यात मतभेद झाले, असं खोत म्हणाले. खोत यांनी दिलेल्या दिलजमाईच्या संकेतांना राजू शेट्टी सकारात्मक प्रतिसाद देणार का, याची उत्सुकता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्यात काही वाद झाले. आमचं काही शेताच्या बांधावरचं भांडण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारणीत आम्ही शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा, अशी मागणी केली. स्वाभिमानीचीदेखील तीच मागणी आहे. चांगल्याला चांगली म्हणण्याची दानत आमच्यात आहे. आमचं आणि त्यांचं मत एकच आहे, असं सदाभाऊ म्हणाले. ते 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलत होते.तुमची आणि राजू शेट्टींची मागणी आणि भूमिका एकच असली तर मग एकत्र येणार का, असा प्रश्न खोत यांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं. काही मुद्द्यांवरून आमचे मतभेद झाले. पण आमची विचारधारा एकच आहे. राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेल्यानं आमच्यात दरी निर्माण झाली, असं खोत पुढे म्हणाले. सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून खोत यांनी रयत क्रांती संघटना उभारली. राजू शेट्टींचं राजकारण कमकुवत करण्यासाठी भाजपनं त्यांच्याशी जवळीक साधली. मात्र आता जिल्ह्यातल्या राजकारणात त्यांना डावललं जात असल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे खोत भाजपवर नाराज असल्याचं समजतं. केंद्रानं आणलेल्या शेतकरी कायद्यांवरही खोतांनी टीका केली होती.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत BJPभाजपा