शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Rajiv Satav: “माझा मित्र गमावला, आपल्या सर्वांचं मोठं नुकसान”; खासदार राहुल गांधींना दु:ख अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 10:36 IST

Congress MP Rajiv Satav passes away: राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जायचे

ठळक मुद्देमाझा मित्र राजीव सातव गमावल्याने मला फार वेदना होत आहेतराजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होतेशिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा राजीव सातव यांनी पराभव केला होता

नवी दिल्ली – काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. नुकतेच ते कोरोनातून बरे झाले होते. परंतु सायटोमेगँलो व्हायरस या आजाराच्या विळख्यात अडकले. शुक्रवारपासून राजीव सातव यांची तब्येत खालावत होती. अखेर रविवारी पहाटे राजीव सातव यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली.

राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जायचे. राजीव सातव यांच्या निधनानंतर राहुल गांधींनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे की, माझा मित्र राजीव सातव गमावल्याने मला फार वेदना होत आहेत. काँग्रेसच्या विचारसरणीला आणि आदर्शांना बळकटी देणारं आदर्श नेतृत्व होते. त्यांच्या जाण्यानं आपल्या सर्वांचे मोठं नुकसान झालं आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे असं राहुल गांधी म्हणाले.

भारतीय राजकारणातला सुसंस्कृत चेहरा हरपला

काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे  मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

निःशब्द ! खासदार राजीव सातव यांचं निधन, काँग्रेसने ट्विट करुन दिली माहिती

मनाला न पटणारी घटना

काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राजीव सातव यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता आज सकाळीच सर्वांना कळाली. अतिशय धक्कादायक आणि निराश करणारी अशी ही बातमी आहे. अतिशय वेदना देणारी आणि मनाला न पटणारी अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे. राजीव सातव धडाडीचे नेते होते अतिशय अल्प काळामध्ये त्यांनी जिल्ह्यापासून ते थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या कर्तुत्वाने त्या ठिकाणी आपली उंची वाढवली. काँग्रेस पक्षामध्ये अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने काम करणारा असा हा सहकारी आज आमच्यामधून गेल्याची खंत आम्हा सर्वांना आहे असं दु:खं मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

कोण होते राजीव सातव?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट आली होती. अशा काळात राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा युतीला धूळ चारली होती. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा राजीव सातव यांनी पराभव केला होता. राजीव सातव हे सध्या राज्यसभेचे खासदार होते त्याचसोबत त्यांच्यावर गुजरात काँग्रेसच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासू शिलेदार आहेत. तसेच माजी मंत्री रजनी सातव यांचे पुत्र आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसRajeev Satavराजीव सातवRahul Gandhiराहुल गांधीAjit Pawarअजित पवारAshok Chavanअशोक चव्हाण