शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

म्हणून राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट न घेताच विधान भवनातून फिरले माघारी

By बाळकृष्ण परब | Published: March 02, 2021 3:34 PM

Raj Thackeray News : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेण्यासाठी विधान भवनात आले होते. मात्र ते मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच माघारी परतले. 

मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण तापलेले आहे. (Maharashtra Politics) कोरोनाचा पुन्हा वाढलेला संसर्ग, वीजबिल तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक आहेत. अशा परिस्थितीत मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेण्यासाठी विधान भवनात आले होते. मात्र ते मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच माघारी परतले.  (Raj Thackeray went to meet the Chief Minister Uddhav Thackeray, but walked back through the door of the Vidhan Bhavan )

सध्या राज्यात कोरोनाचा फैलाव वाढलेला असल्याने कोरोनाबाबतचे नियम अधिक सक्त करण्यात आले आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच कडक निमयांची अंमलबजावणी करून होत आहे. त्यामुळे विधान भवनाच्या आवारात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य करण्यात आली आहे. कोरोना चाचणी केलेली नसल्यास विधान भवनात प्रवेश दिला जात नाही.

दरम्यान, आज राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विधान भवनाजवळ गेले होते. मात्र त्यांनी कोरोनाची चाचणी केलेली नव्हती. विधान भवानात जाण्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य असल्याचे कळाल्यानंतर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच विधान भवनाच्या आवारातून माघारी फिरले.   

गेल्या काही दिवसांपासून मनसे राज्य सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे. राज्यात कोरोनाचे  नियम कडक केलेले असताना आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात रात्रीच्या वेळी पब सुरू असल्याचे मनसैनिकांनी नुकतेचे फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून दाखवून दिले होते. तर काही दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येवरही शंका उपस्थित केली होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार