शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

राज ठाकरे कुणाचे स्टार प्रचारक?-भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या प्रचाराचा खर्च निवडणूक आयोगाला पक्षाच्या खर्चातून नियमितपणे सादर केला जातो,

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या प्रचाराचा खर्च निवडणूक आयोगाला पक्षाच्या खर्चातून नियमितपणे सादर केला जातो, परंतु मनसे निवडणूकच लढवित नसल्यामुळे त्यांना कदाचित या गोष्टी समजत नसतील, असा टोला लगावतानाच मोदी भाजपचे स्टार प्रचारक आहेत, राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत, हे मनसेने जाहीर करावे, असे आव्हान भाजपने दिले आहे.भाजपने निवडणूक आयोगाकडे मनसेचा खर्च मागितला नव्हता, तर राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खात्यात दाखविणार, एवढीच विचारणा व मागणी आयोगाकडे केली होती. यावर, मनसेने आधी पंतप्रधानांच्या सभेचा खर्च मागितला. मोदी भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे नियमानुसार पक्षाच्या खर्चातून ती माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली जाते, परंतु मनसे निवडणूक लढवत नाहीत, केवळ प्रचार सुरू आहे. त्यामुळे ही साधी बाब त्यांच्या ध्यानात आली नसावी, अशी कोपरखळी मारतानाच, राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत, हे मनसेने जाहीर करावे, असे आवाहनही तावडे यांनी यावेळी केले.मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही खरे नाही. त्यामुळे आता आमची अस्तित्वाची लढाई सुरू आहे, असे स्पष्ट विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीत केले आहे. काँग्रेसला राज्यात स्ट्राँग नेता नसल्यामुळे, मोदी पवारांवर टीका करतात. त्यामुळे काँग्रेसचे आव्हानच नाही, तर अस्तित्वच जवळजवळ संपल्यासारखे असल्याचे पृथ्वीराज बाबांनी मान्य केले आहे. त्यांच्या या विधानावरून आघाडी महाराष्ट्रात लोकसभेची एकही जागा जिंकणार नाही, हे स्पष्ट झाल्याचेही तावडे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा