‘राहुल रन’, ‘मोदी व्हर्सेस केजरी’ गेम्सचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 03:53 AM2019-04-19T03:53:12+5:302019-04-19T03:54:00+5:30

लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे राजकीय रंग चढू लागले आहे.

'Rahul Run', 'Modi vs Kejriya' Games | ‘राहुल रन’, ‘मोदी व्हर्सेस केजरी’ गेम्सचा धुमाकूळ

‘राहुल रन’, ‘मोदी व्हर्सेस केजरी’ गेम्सचा धुमाकूळ

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे राजकीय रंग चढू लागले आहे. मोबाइलमधील प्ले-स्टोअर अ‍ॅपमध्ये आता ‘मोदी रन’ , ‘राहुल रन’, ‘मोदी वर्सेस केजरी’ या राजकीय नेत्यांच्या नावाने गेम्सची निर्मिती करण्यात आली आहे. तरुण व नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष विविध कल्पनांचा वापर करीत आहेत. या निवडणुकीत ८ कोटी ४० लाख तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. हे व्हिडिओ गेम्स आतापर्यंत दहा लाखाहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहेत. या मोबाइल गेम्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीकेंद्रित व्हिडिओ गेम्सची निर्मिती केली आहे.
>टू-डी व थ्री-डीमध्ये गेम्स उपलब्ध
निवडणुकीदरम्यान टू-डी व थ्री-डी ग्राफिक्समध्ये या गेम्सची उपलब्ध आहेत. यातील अनेक गेम्स २०१५ पासून प्लेस्टोरमध्ये आहेत मात्र निवडणुकीच्या माहोलमध्ये अपडेट करण्यात आले आहेत.
>काय आहे गेम?
‘मोदी फॉर इंडिया २०१९’ नावाच्या मोदींवर आधारित गेममध्ये आभासी मोदींच्या माध्यमातून येणाºया अनेक संकटावर मात करत मोदी कशाप्रकारे पुढे जात आहे हे दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘मोदी वर्सेस केजरी’ या गेममध्ये आभासी जगातील मोदी आणि केजरीवालांमध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी खेळले जाणारे युद्ध दाखवण्यात आले आहे.
‘मोदी रन - २०१९’ या गेममध्ये वापरक र्त्याला आभासी कमळाची फुले गेम जिंकण्यासाठी एकत्र करायची असतात. विशेष म्हणजे हे गेम खेळताना नोटाबंदी , राफेल, जीएसटीसारख्या अडचणींपासून स्वत:ला वाचवायचे असते . तर ‘राहुल रन’ गेममध्ये जिंकण्यासाठी आभासी हाताचे पंजे एकत्र करायचे आहेत.

Web Title: 'Rahul Run', 'Modi vs Kejriya' Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.