बंगळुरू : मी राजकारणातून निवृत्त होणार नाही; पण मला पंतप्रधानपदाची इच्छा नाही. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास मी त्यांच्या शेजारी बसेन, अशा स्पष्ट शब्दांमध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी कॉँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.देवेगौडा यांच्या कर्नाटकातील तुमकूर मतदारसंघात गुरुवारी मतदान पार पाडले. त्यानंतर बोलताना त्यांनी आपण तीन वर्षांपूर्वीच निवडणूक न लढविण्याची घोषणा केली होती, याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, तीन वर्षांमध्ये परिस्थिती बदलल्यानेच मला निवडणूक लढवावी लागली. मला मोदी संसदेमध्ये नको आहेत. मी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार नाही.त्यांचे चिरंजीव व कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी देवेगौडा पंतप्रधानपदासाठी सर्वसंमतीचे उमेदवार होऊ शकतात, असे म्हटले होते. त्यावर देवेगौडा यांनी आपल्याला कोणत्याही पदाची अभिलाशा नसल्याचे सांगितले.
'पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना पाठिंबा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:01 IST