शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गलती से मिस्टेक! राहुल गांधींचा गरिबीऐवजी गरिबांवर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 16:47 IST

न्याय योजनेची घोषणा करताना राहुल गांधींची चूक

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसनं जाहीरनामा जाहीर केला. या जाहीरनाम्याला काँग्रेसनं 'जन आवाज' असं नाव दिलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनामा पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर 'हम निभाएंगे' असं लिहिण्यात आलं आहे. काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणे या जाहीरनाम्यात न्याय योजनेचा उल्लेख केला. याबद्दल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना राहुल गांधींकडून एक चूक झाली. गरिबीवर वार म्हणण्याऐवजी ते चुकून गरिबांवर वार असं म्हणाले. राहुल गांधींनी न्याय योजनेसह काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पाच महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली. यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी न्याय योजनेवर भाष्य करताना राहुल गांधी गडबडले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी जर 30 हजार कोटी रुपये उद्योगपतींना देऊ शकतात, तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु शकतो. आमची भूमिका स्पष्ट आहे. 72 हजार गरिबांवर वार, 72000,' असं राहुल म्हणाले. आपल्याला गरिबीवर वार करायचा आहे, असं राहुल गांधींना म्हणायचं होतं. मात्र चुकून ते गरिबांवर वार असं म्हणून गेले. विशेष म्हणजे राहुल गांधींना त्यांची चूक लक्षातच आली नाही. ते यानंतरही बोलतच होते. त्यांनी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरंदेखील दिली. पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील प्रश्न विचारायला हवेत, असं राहुल यांनी म्हटलं. मोदी पत्रकार परिषद घेण्यास का घाबरतात, असा प्रश्न पत्रकारांनी मोदींना विचारायला हवा, असं काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी न्याय योजनेसोबतच इतर चार मुद्द्यांवरही भाष्य केलं. काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेल्या पंजाला पाच बोटं आहेत. त्याप्रमाणेच काँग्रेसच्या जाहीरमान्यातही पाच प्रमुख घोषणा असल्याचं यावेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी सांगितलं. न्याय योजनेसह रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी