शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या पक्षाचा प्रचार न करणारे राधाकृष्ण विखे हे पहिले विरोधी पक्षनेते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 07:18 IST

लोकसभा निवडणुकीत स्वपक्षाचा प्रचार न करणारे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे हे देशातील एकमेव विरोधी पक्षनेते ठरले आहेत.

- अतुल कुलकर्णी मुंबई : लोकसभा निवडणुकीत स्वपक्षाचा प्रचार न करणारे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे हे देशातील एकमेव विरोधी पक्षनेते ठरले आहेत.पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार यांना तडकाफडकी पक्षातून निलंबित करण्यात आले. मात्र विखेंच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. योग्यवेळी त्यावर निर्णय घेतला जाईल असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यावर काहीही बोलायला तयार नाहीत.भाजप सोबत विखे यांच्या जवळीकीची सतत चर्चा होत होती. अगदी सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर निघाले तेव्हा त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते म्हणून विखे ही निघाले होते. राज्याच्या इतिहासात एकही विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्र्यांच्या सरकारी दौºयात गेलेला नाही. माध्यमांनी टीका केल्यानंतर विखे यांनी तो दौरा रद्द केला होता. मात्र विधानसभेतही त्यांच्या कार्यपध्दतीवर त्यांच्याच पक्षाचे नेते कायम नाराजी व्यक्त करत आले. त्यानंतर त्यांचा मुलगा भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करत आपण अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसचा प्रचार करणार नाही असे जाहीर केले होते. मात्र त्यांनी नगरमध्येच नाही तर राज्यात कोठेही काँग्रेसच्या प्रचारासाठी एकही सभा घेतलेली नाही. काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या यादीत त्यांचे नाव असूनही त्यांना पक्षाच्या एकाही उमेदवाराने आपल्या मतदारसंघात प्रचाराला या, असे निमंत्रण दिले नाही आणि त्यांनीही कोठे जाऊन प्रचार केला नाही.विखे यांच्यावर कधी कारवाई करणार असे विचारले असता प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. सुजय विखे निवडून आले तर राधाकृष्ण विखे स्वत:च भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेस