"प्यार किया तो डरना क्या?," आता शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण

By बाळकृष्ण परब | Published: January 13, 2021 06:51 PM2021-01-13T18:51:08+5:302021-01-13T18:53:27+5:30

Dhananjay Munde News : बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने मात्र धनंजय मुंडे यांनी जोरदार पाठराखण केली आहे.

"Pyaar kiya to darna kya ?," Now Shiv Sena leader Abdul Sattar has Backs Dhananjay Munde | "प्यार किया तो डरना क्या?," आता शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण

"प्यार किया तो डरना क्या?," आता शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला धनंजय मुंडेंचा बचाव सत्तार म्हणाले की, संबंधित महिलेसोबतच्या संबंधांबाबत धनंजय मुडे यांनी सोशल मीडियावरून कबुली दिली आहेदोघांच्या संमतीने असलेल्या संबंधांची त्यांनी कबुली दिली आहे

जालना - एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आले आहेत. या प्रकरणी सदर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र धनंजय मुंडे यांनी जोरदार पाठराखण केली आहे. प्यार किया तो डरना क्या..., अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडेंचा बचाव केला आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, संबंधित महिलेसोबतच्या संबंधांबाबत धनंजय मुडे यांनी सोशल मीडियावरून कबुली दिली आहे. दोघांच्या संमतीने असलेल्या संबंधांची त्यांनी कबुली दिली आहे. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना उद्देशून काढलेल्या उदगारांचीही आठवण काढली आणि प्यार किया तो डरना क्या, असे बाळासाहेब तेव्हा म्हणाले होते, असे सांगितले.
तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांनीही निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रामध्ये माहिती लपवली होती. अशा नेत्यांची नावे आपण लवकरच जाहीर करू, असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

दरम्यान, बलात्काराचा आरोप झाल्याने धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून चौफेर टीका होत आहे. त्यादरम्यान, मुंडे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. तसेच आज दिवसभरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेटली आहे.
 

Web Title: "Pyaar kiya to darna kya ?," Now Shiv Sena leader Abdul Sattar has Backs Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.