शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

कृत्रिम वलय बाजूला ठेवून जमिनीवर या, आशिष शेलार यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 23:41 IST

Ashish Shelar News : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही हे सत्य आहे. त्यामुळे माझ्यासह माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी अभ्यास दौरा करून त्यातून धडा घेतला आहे

सावंतवाडी - कोकणात शिवसेनेचे वलय हे कृत्रिम आहे त्यानी नुसती वातावरण निर्मिती केली आहे शिवसेनेने वेळीच जमिनीवर यावे अन्यथा त्यांना येथील जनता  येणाऱ्या निवडणुकीत जमिनीवर आणेल अशी टीका माजी मंत्री तथा भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांच्या सुरक्षित केलेली कपात म्हणजे असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय असल्याची टिका ही  त्यांनी यावेळी केली.भाजपा नेता आशिष शेलार हे रविवारी सावंतवाडी आले असता येथील नगरपालिकेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली नगराध्यक्ष संजू परब जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, अॅड. परिमल नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, महिला शहर मंडल अध्यक्ष मोहिनी मडगावकर, मिसबा शेख, दिलीप भालेकर, महेश पांचाळ, बांदा सरपंच अक्रम खान, बंटी पुरोहित, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही हे सत्य आहे त्यामुळे माझ्यासह सह माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी अभ्यास दौरा करून त्यातून धडा घेतला आहे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा स्थानिक पातळीवरच सक्षम असल्याने वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही प्रकारे व्यापक दृष्टीने काम करण्याचा प्रश्न नाही फक्त कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा आपला दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. तर सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकारने केलेले कपात म्हणजे असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय आहे मात्र पोलिसांनी जनतेची सुरक्षा करावी हेच अपेक्षित आहे आणि आमचेही असेच म्हणणे आहे त्यामुळे याच भूमिकेतून त्यांनी जर कपात केली असेल तर टीका करणे योग्य नाही असेही ते म्हणाले.मुंबईमध्ये शिवसेनेने गुजराती लोकांसाठी घेतलेले मिळावे यामुळे मुंबईत भाजपाला तोटा होणार का असे त्यांना विचारले असता ते म्हणाले की शिवसेनेच्या भेसळयुक्त हिंदुत्व वादामुळे निर्माण झालेला खड्डा भरून काढण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे मात्र हा प्रयत्न मुंबईची जनता आणून पडणार असून येणाऱ्या निवडणुकीत मुंबईकर सुनेला धडा शिकवतील असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेने आगीशी खेळू नये..राज्याचे नेतृत्व केलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे त्यांच्या सुरक्षितेच्या बाबतीत वर्गीकरण रद्द करायच आणि दुसरीकडे आमदार वैभव नाईक यांना वर्गीकरण द्यायचं असा अपव्यवहार राज्यात कधीच घडला नव्हता मात्र राज्य सरकार दुटप्पी भूमिका खेळत असून त्यांनी आगीशी खेळू नये आगीशी खेळल्यावर काय होते याची अनुभूती त्यांनी घ्यावी असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणSawantwadiसावंतवाडी