लस देण्यासाठी ३५ हजार कोटींची तरतूद! मग, जनतेकडून का पैसे घेता?; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 05:11 AM2021-03-03T05:11:35+5:302021-03-03T05:12:18+5:30

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना नेमून दिलेल्या केंद्रांमध्ये कोविड प्रतिबंधक लस घेण्याचे प्रावधान आहे. यामध्ये केंद्र शासनाने लसीची किंमत २५० रुपये प्रति डोस इतकी ठेवली आहे.

Provision of Rs 35,000 crore for vaccination! So, why take money from the public? | लस देण्यासाठी ३५ हजार कोटींची तरतूद! मग, जनतेकडून का पैसे घेता?; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

लस देण्यासाठी ३५ हजार कोटींची तरतूद! मग, जनतेकडून का पैसे घेता?; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अर्थसंकल्पात लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनदेखील मोदी सरकार सामान्य लोकांकडून पैसे का घेत आहे, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. १ मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या सरकारच्या निर्णयावर चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना नेमून दिलेल्या केंद्रांमध्ये कोविड प्रतिबंधक लस घेण्याचे प्रावधान आहे. यामध्ये केंद्र शासनाने लसीची किंमत २५० रुपये प्रति डोस इतकी ठेवली आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केंद्र  शासनाने १.६५ कोटी लसींचे डोस खरेदी केले होते. १२ फेब्रुवारी रोजी लोकसभेत दिलेल्या एका उत्तरानुसार प्रत्येक डोसची किंमत २१० रुपये होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी  १ फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या अर्थसंकल्पीय भाषणानुसार लसीकरण मोहिमेसाठी ३५ हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. एवढ्या रकमेमध्ये दीड अब्जाहून अधिक डोस विकत घेता येतील, आणि ७५ कोटी लोकसंख्येचे लसीकरण करता येईल. म्हणजेच भारतातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण अर्थसंकल्पीय तरतुदीतून करता येणे शक्य आहे. असे असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत आहे?

मोफत लस का नाही?
n अमेरिका, इंग्लंड किंवा कॅनडासारख्या मोठ्या देशांमध्ये सर्व  नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे. यासाठी त्या देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या विमा योजनांचा किंवा अर्थसंकल्पीय तरतुदीचा आधार घेतला जात आहे. 
n प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना (आयुष्मान-भारत) मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
 

Web Title: Provision of Rs 35,000 crore for vaccination! So, why take money from the public?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.